Smriti Irani News : राहुल गांधींच्याविरोधात स्मृती इराणी मैदानात; म्हणाल्या...

Rahul Gandhi : ''अमेठी मतदारसंघातील जनतेने गांधी कुटुंबांना जादू दाखवली...''
Smriti Irani
Smriti Irani Sarkarnama

Congress : काँग्रेस नेते राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर संसदेतही उद्योजक गौतम अदाणींवरुन पंतप्रधान मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला.

यावरूनच मंत्री स्मृती इराणी या राहुल गांधींच्याविरोधात मैदानात उतरल्या आहेत. ''अमेठी मतदारसंघातील जनतेने राहुल गांधींना जादू दाखवली होती'', असं म्हणत गांधींवर त्यांनी निशाणा साधला.

स्मृती इराणी म्हणाल्या, ''गांधी कुटुंब अमेठीचा विकास करू शकलं नाही. त्यामुळे त्यांना अमेठी मतदारसंघातील जनतेने जादू दाखवली होती. अमेठीत १९८१ मध्ये एका संस्थेने ६२३ रुपयांच्या भाडेतत्वावर ४० एकर जमिनीवर कब्जा केला होता.

त्या जमिनीवर वैद्यकीय सुविधा उभारण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण ३० वर्ष अमेठीतील लोकांना सांगितलं जात की, तिथे एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू केलं जाईल. पण अद्याप तेथे काहीच सुरू करण्यात आलेलं नाही. याच ठिकाणी या कुटुंबाने स्वतःसाठी गेस्ट हाऊस बांधलं'', अशी घणाघाती टीका गांधींवर केली.

Smriti Irani
Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाच्या निकालाची कुणकुण लागली? म्हणाले...

त्या पुढे म्हणाल्या, ''या कुटुंबाने लोकांना एक कारखाना सुरू करण्यासाठी बोलावलं होतं. यासाठी त्यांनी जमीन घेतली होती. पण तो कारखाना त्यानंतर अचानक बंद झाला. त्यानंतर तेथील जमिनीवर या कुटुंबाने कब्जा केला. तेथील शेतकऱ्यांनी त्या कुटुंबाविरोधात न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यानंतरही या जमिनीचा ताबा कायम ठेवला गेला. मग आता हेच लोक संसदेत येऊन जनतेबाबत बोलू लागलेत ”, असंही यावेळी त्या म्हणाल्या.

Smriti Irani
Aditya Thackeray News : पोलिस म्हणतात, दगडफेक झालीच नाही; सभा सुरळीत पार पडली, ठाकरेही सुखरूप परतले..

दरम्यान, अमेठी मतदारसंघ हा गांधी कुटुंबांचा बालेकिल्ला मानला जायचा. पण २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत राहुल गांधींचा (Rahul Gandhi) या मतदारसंघातून पराभव झाला. तेथे स्मृती इराणी (Smriti Irani) या निवडून आल्या. त्यामुळे इराणी यांनी गांधींना त्यांच्या पराभवाची आठवण करून देत घणाघाती टीका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com