West Bengal : पोलीस ठाण्याजवळच BJP नेत्याची गोळ्या झाडून हत्या..

BJP leader Raju Jha shot dead : एका कारमधून दोन आरोपी तेथे आले.
West Bengal  bjp leader shot dead
West Bengal bjp leader shot dead Sarkarnama

West Bengal bjp leader shot dead : पश्चिम बंगालच्या पूरब बर्धमान जिल्ह्यात भाजपच्या (bjp) नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. काल (शनिवारी) ही घटना घडली. राजू झा असे त्यांचे नाव आहे. (BJP leader Raju Jha shot dead in West Bengal's Bardhaman)

उद्योगपती असलेले राजू झा हे कोलकात्ता येथे जात असताना शक्तिगढ पोलीस ठाण्याजवळ एका मिठाईच्या दुकानासमोर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. ते आपल्या कारमध्ये बसले असताना दोन आरोपी अन्य एका कारमधून तेथे आले.

एकाने राजू झा यांच्या कारची काच राँडने फोडली, तर दुसऱ्यांने त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. यात राजू झा यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. हल्लेखोर फरार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पुढील तपास सुरु आहे.

West Bengal  bjp leader shot dead
Karnataka : चार वेळा आमदार असलेल्या रामास्वामींनी हाती घेतले कमळ ; 'जेडीएस'च्या बालेकिल्ल्याला खिंडार

राजू झा यांना पाच गोळ्या लागल्या आहेत, हल्लामागील कारण अद्याप कळाले नसल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले. टीएमसी सरकारच्या काळात राजू झा यांच्यावर कोळसा गैरव्यवहारात कारवाई करण्यात आली होती. त्यांना कोळसा गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली होती. हाँटेल व्यावसायिक असलेले राजू झा गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्य सामील झाले होते.

West Bengal  bjp leader shot dead
Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजांनी पुन्हा तोडले अकलेचे तारे ; म्हणाले,'गांधींबाबत गोडसेंनी योग्यच ..'

अशीच एक घटना पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातून शनिवारी घडली. शिरगाव ग्रामपंचायतील विद्यमान सरपंच प्रवीण साहेबराव गोपाळे (वय ४७, रा. खळवाडी, शिरगाव) यांचा निर्घून खून करण्यात आला. तीन अज्ञातांनी धारदार हत्याराने सपासप वार करून गोपाळे यांचा खून केला.

प्रवीण गोपाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) काम करत होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते सक्रिय होते. नुकत्याच राज्यात ग्रामपंचायत निवडणुका (Gram panchayat Election) पार पडल्या होत्या. त्यानुसार शिरगाव या ग्रामपंचायतीचीही निवडणूक पार पडली होती. शिरगाव सरपंचपदाच्या निवडणुकीत प्रवीण गोपाळे यांची बिनविरोध सरपंच (Sarpanch) म्हणून निवड झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com