पक्ष बदलला म्हणून निवडणूक हरले; भाजपमध्ये गेलेल्या माजी मंत्र्यांची कबुली

पक्ष बदलला नसता तर मला कुणीच हरवू शकले नसते, असं वक्तव्य भाजपच्या महिला नेत्यानं केले आहे.
Imarti Devi
Imarti DeviSarkarnama

ग्वाल्हेर : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांच्यासह काँग्रेसच्या काही आमदारांनी पक्षांतर करत पक्षाला धक्का दिला होता. हे सर्व जण भाजप (BJP) मध्ये दाखल झाल्याने काँग्रेसला (Congress) मध्य प्रदेशातील सत्ता गमवावी लागली. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षांतर केलेल्या काही आमदारांचा पराभव झाला. शिंदे यांच्या कट्टर समर्थक असलेल्या माजी आमदाराचाही त्यात समावेश आहे. पक्ष बदलला म्हणून आपला पराभव झाल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या नेत्यांमध्ये माजी मंत्री इमरती देवी यांचे नाव घेतले जाते. त्या 2008 पासून आमदार होत्या. काँग्रेसच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रीही करण्यात आलं होतं. त्यांनी पक्षांतर केल्यानंतर भाजपने पोटिनिवडणुकीत (Election) उमेदवारी दिली. पण या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

Imarti Devi
कोरोना नियंत्रणाबाहेर; राजधानीत खासगी कार्यालये, रेस्टॉरन्ट, बार आजपासून कुलूपबंद

हा पराभव इमरती देवी यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. याबाबत त्यांनी सातत्याने बोलूनही दाखवले आहे. नुकत्याच ग्वाल्हेरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत पुन्हा वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या, 'मी 2008 पासून आमदार राहिले आहे. पण यावेळी पराभव झाला. मी पक्ष बदलल्याने पराभव झाला. अन्यथा मला कुणीच हरवू शकलं नसतं.' इमरती देवी यांना नुकतेच लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्ष करण्यात आले आहे.

Imarti Devi
कोरोना चाचणी कुणाची करावी, कुणी करू नये? केंद्र सरकारचा मोठा निर्णय

इमरती देवी 2018 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. लोकसभा निवढणुकीत शिंदे यांचा पराभव झाल्यानंतर राज्यात त्यांचे महत्व कमी होऊ लागले. यावेळी इमरती देवी या शिंदे यांच्याबाजूने सर्वात आधी उभ्या राहिल्या होत्या. त्यांनी नंतर शिंदे यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. डबरा विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. पण त्यांना दिराकडूनच पराभव पत्करावा लागला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com