राष्ट्रपती निवडणूक : भाजपने आधी उमेदवार सांगावा मग आम्ही पाठिंब्याचे ठरवू!

राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.
Akhilesh Yadav, Mamata Banerjee, Rajnath Singh
Akhilesh Yadav, Mamata Banerjee, Rajnath Singhsarkarnama

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी बुधवारी या मुद्द्यावर काँग्रेस (Congress) नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge), तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्याशी संपर्क साधला. (presidential election 2022 news)

राजनाथ सिंह यांनी या नेत्यांशी संपर्क साधून उमेदवार सुचविण्यास सांगितले. मात्र, या नेत्यांनी ‘एनडीए’चा उमेदवार कोण आहे ते आधी सांगावे? अशी विचारणा राजनाथसिंह यांच्याकडे केली. त्यावर उत्तर मिळाले नसल्याचेही या नेत्यांचे म्हणणे होते. विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर एनडीएच्या घटक पक्षांची बैठक होणार आहे. ज्यामध्ये उमेदवाराच्या नावावर चर्चा होईल, त्यानंतर भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीला जाण्यापूर्वी एनडीएच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजनाथ सिंह यांनी एनडीएचे घटक पक्ष असलेल्या जेडीयूचे नेते नितीश कुमार यांच्याशीही चर्चा केली.

Akhilesh Yadav, Mamata Banerjee, Rajnath Singh
शरद पवार निवडणुकीच्या राजकारणात सक्रिय राहणार; राष्ट्रपतीपदासाठी सर्वसहमतीचा नवा चेहरा

दरम्यान, पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी (Mamata Banerjee) विरोधी पक्षांच्या नेत्यांची दिल्लीत बैठक बोलावली होती. त्यामध्ये अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते. मात्र, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा टीआरएस, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली व पंजाबात सत्ता असणारा आम आदमी पक्ष, आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर कांग्रेस, ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा बीजू जनता दल व अकाली दल यांचे प्रतीनिधी बैठकीला उपस्थित नव्हते.

मायावतींचा बहुजन समाज पक्ष व असदुद्दिन ओवैसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या पक्षांना ममता यांनी आमंत्रणच दिले नाही, असे कळते. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयनच नव्हे तर डाव्या पक्षांचे सीताराम येच्युरी व डी राजा हे सर्वोच्च नेते या बैठकीपासून दूर राहिले आहेत.

Akhilesh Yadav, Mamata Banerjee, Rajnath Singh
राष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांनी रणनिती बदलली; पवारांच्या नकारामुळे एकजूटीचे आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी राजनाथसिंह व भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना मित्रपक्ष व सहयोगी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्यास सांगितले. आता राजनाथसिंह यांनी थेट खर्गे, बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांनाच फोन लावल्याचे वृत्त आले आहे. भाजपने निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु केल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com