भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याची व्हि़डीओ क्लिप व्हायरल अन् दोन नेत्यांची विकेट

संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपचे प्रदेश महासचिवांनीआपल्या पदाचा लगेचच राजीनामा दिला.
K T Raghavan
K T Raghavan

चेन्नई : तमिळनाडू भाजपमध्ये मागील दोन दिवसांपूर्वी मोठा भूकंप झाला आहे. एका बड्या नेत्याचे पक्षाच्याच महिला पदाधिकाऱ्यासोबतचे व्हिडीओ कॉलवरील संभाषण सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. पक्षाच्याच एका पदाधिकाऱ्याने हे संभाषण व्हायरल केले असून ते स्टिंग ऑपरेशन असल्याचा दावा त्याने केला आहे. या क्लिप व्हायरल झाल्यानंतर क्लिपमधीने नेत्यानं तडकाफडकी राजीनामा दिला तर क्लिप व्हायरल करणाऱ्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. (BJP Leader Quits Post After Alleged Sleaze Video)

संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपचे प्रदेश महासचिव के. टी. राघवन यांनी आपल्या पदाचा लगेचच राजीनामा दिला. त्यानंतर पक्षाचे सदस्य असलेले व युट्यूबर मदन रविचंद्रन यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांचे युट्यूब अकाऊंटही बंद करण्यात आले आहे. रविचंद्रन यांनी युट्यूबवर ही अश्लील संभाषणाची व्हिडीओ क्लिप टाकली होती. त्यामध्ये एक व्यक्ती एका महिलेसोबत बोलताना दिसत आहे. यामध्ये महिलेचा चेहरा मात्र दिसत नाही. संबंधित व्यक्ती राघवन असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. 

रविचंद्रन यांच्या दाव्यानुसार प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांना या क्लिपबाबत आधीच माहिती देण्यात आली होती. त्यांच्या संमतीनंतरही ही क्लिप युट्यूब टाकल्याचे त्यांचं म्हणणं आहे. रविचंद्रन यांनी आपल्याकडे असे जवळपास 15 व्हिडीओ असल्याचा दावाही केल्यानं भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. राघवन यांचे स्टिंग ऑपरेशन करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर हे हनी ट्रॅप असल्याचा आरोप काही जणांनी केला आहे. व्हिडीओतील महिला जिल्हा स्तरावरील नेता असल्याची माहिती रविचंद्रन याचा सहकरी वेनबा याने दिली आहे. तसेच आता आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोपही त्याने केला आहे.

व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर अण्णामलाई यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. राघवन यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर मदन हा अण्णामलाई यांच्याकडं पक्षाच्या काही सदस्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी आला होता. कारवाई करण्यापूर्वी पुरावे देण्याची मागणी त्याच्याकडे केली होती. पण त्याने मदनने असे कोणतेही पुरावे दिले नाहीत, असं सुत्रांनी सांगितलं. 

राघवन यांनी ट्विट व फेसबुकच्या माध्यमातून राजीनाम्याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, मागील 30 वर्षांपासून मी कोणत्यासाठी लाभाची अपेक्षा न करता पक्षाची सेवा करत आहे. मला व्हिडीओची सकाळी (मंगळवारी) माहिती मिळाली. मला व पक्षाला बदनाम करण्याच्या उद्देशाने हे केलेले आहे. मी सर्व आरोप फेटाळून लावतो. याला कायद्याच्या चौकटीतून उत्तर दिले जाईल. सत्य समोर येईल,' असं राघवन यांनी म्हटलं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com