"प्रत्येक न्यायालयांकडून सातत्याने चपराक खावून CM ठाकरेंचे दोन्ही गाल सूजले"

Kirit Somaiya | Uddhav Thackeray : राणा दाम्पत्यांची भेट घेतल्यानंतर सोमय्यांचा ठाकरेंवर निशाणा
Kirit Somaiya, Uddhav Thackeray
Kirit Somaiya, Uddhav Thackeraysarkarnama

(Kirit Somaiya Latest News)

दिल्ली : कनिष्ठ, वरिष्ठ, कधी उच्च तर कधी सर्वोच्च न्यायालय. अशा सगळ्या न्यायालयांकडून सातत्याने चपराक खावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे दोन्ही गाल सूजले आहेत. दोनच गाल आहेत. त्यावर किती चपराक खाणार? अशी खोचक टीका भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. ते दिल्लीत खासदार नवनीत राणा, आमदार रवि राणा यांची भेट घेतल्यानंतर बोलत होते. (Kirit Somaiya Latest News)

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज दिल्लीत ठाण मांडून असलेल्या राणा दाम्पत्यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी जावून भेट घेतली. यापूर्वी मुंबईतही लीलावती हाँस्पिटलमधे सोमय्या यांनी राणा दाम्पत्याची भेट घेतली होती. त्यानंतर आता दिल्लीतही सोमय्या राणा दाम्पत्याला साथ देताना दिसत आहेत. यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांच्यावर विविध विषयांवरुन टीका केली.

Kirit Somaiya, Uddhav Thackeray
दिल्लीत राजकीय घडामोडी; शेलारांपाठोपाठ सोमय्यांचीही राणा दाम्पत्यांसोबत खलबत

सोमय्या म्हणाले, न्यायालयाने काल राजद्रोहाचे (Sedition) कलम तात्पुरत स्थगित केले. उद्धव ठाकरे सरकारने राणा दाम्पत्याविरोधात हेच कलम लावले असल्याने ठाकरे सरकारला यावरून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा चपराक मारली आहे. यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयानेही राणा दाम्पत्यावर लावलेले राजद्रोहाचे कलम योग्य नसल्याचे निरीक्षण नोंदवलं होते. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार आणखी किती वेळा आणि किती न्यायालयांकडून चपराक खाणार, असा सवालही त्यांनी केला.

यावेळी सोमय्या यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्यावरही निशाणा साधला. संजय पांडे यांचा वापर उद्धव ठाकरे सरकार माफियाप्रमाणे करत आहेत. मात्र न्यायालयाने सरकारला त्यांची जागा दाखवली. आता ते माफिया पोलिस आयुक्त कुठे आहेत? संजय पांडे साहेब, हिंमत असेल आता सर्वोच्च न्यायालयाला जाब विचारा. आता न्यायालयाने राजद्रोहाचे कलम निरस्त केले. आता उद्धव ठाकरे सरकार काहीही करू शकत नाही, असेही सोमय्या म्हणाले.

Kirit Somaiya, Uddhav Thackeray
Ramesh Latke| शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

माफियांना आम्ही ठिकाणावर आणणार. माफियागिरी ही परिस्थिती हाताच्या बाहेर जात आहे. खासदार आणि आमदारांना धमकी देतात. २० फुट खड्ड्यात गाढण्याची भाषा फक्त माफिया सरकार करू शकते. मी स्वतः लोकसभा अध्यक्षांना भेटून या सरकारच्या माफियागिरीबद्दल तक्रार करणार आहे. मी गृहसचिवांचीही भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचा अंत झाल्यानंतरच आम्ही स्वस्थ बसणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com