राजकारण तापलं! भाजप नेत्यांना घेऊन सोमय्यांची आता गृह राज्यमंत्र्यांकडे धाव

किरीट सोमय्यांची भाजप नेत्यांना घेऊन दिल्लीत धावाधाव
Kirit Somaiya and BJP leaders in Delhi
Kirit Somaiya and BJP leaders in Delhi Sarkarnama

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर हल्ला झाल्यानं राजकारण तापलं आहे. शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचा दावा भाजप नेत्यांनी सुरू केला आहे. यासाठी आज सोमय्यांनी भाजपच्या नेत्यांसह थेट दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन तक्रार केली. यानंतर लगेचच त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या भेटीसाठी धाव घेतली आहे. यामुळे राजकारण तापलं आहे.

किरीट सोमय्या यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. त्यावेळी गृहसचिवांना त्यांनी त्यांच्यावरील हल्ल्याची माहिती देत राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा दावा केला. यानंतर ते थेट केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या भेटीला गेले आहेत. सोमय्यांनी दिल्लीत मॅरेथॉन भेटी सुरू केल्याने मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत. सोमय्यांच्या सोबत भाजपचे इतर नेतेही आहेत. त्यामुळे सोमय्यांच्या या गाठीभेटींकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Kirit Somaiya and BJP leaders in Delhi
..तर सोमय्या दिल्लीला जाऊ शकते नसते! भुजबळांनी सांगितलं कारण

‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा पठणाच्या आंदोलनाचा प्रयत्न करणं खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना महागात पडलं आहे. त्यांना 23 एप्रिलला पोलिसांनी अटक केली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना भेटण्यासाठी सोमय्या पोलीस ठाण्यात गेले असता 23 एप्रिलला त्यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. यानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात मोहीम उघडली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची ओरड करीत सोमय्या यांच्यासह आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, आमदार पराग शाह, आमदार राहुल नार्वेकर आणि भाजपचे महापालिका नेते विनोद मिश्रा यांनी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन तक्रार दिली.

Kirit Somaiya and BJP leaders in Delhi
सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक झाली हे खरंय! गृहमंत्री वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

राणा दांपत्याला अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राणा दांपत्याला 23 एप्रिलला खार पोलीस ठाण्यात भेटायला गेलेल्या सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे, सोमय्यांना झेड प्लस सुरक्षा असतानाही हा हल्ला झाला होता. सोमय्या हे यात किरकोळ जखमी झाले आहेत. सोमय्यांनी या प्रकरणी शिवसैनिकांकडे बोट दाखवलं आहे. तर सोमय्यांनी अंगावर गाडी घातल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com