भाजपच्या कार्यालयात सुरक्षारक्षकासाठी 'अग्निवीर'ला प्राधान्य देऊ!

भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
Kailas Vijayvargiya Latest Marathi News
Kailas Vijayvargiya Latest Marathi NewsSarkarnama

इंदौर : अग्निपथ योजनेवरून देशभरात विरोध होत असताना आता भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या कार्यालयात सुरक्षारक्षक नेमायचे असेल तर मी अग्विवीरला प्राधान्य देईन, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. तसेच इतरांनाही त्यांनी याबाबत आवाहन केलं आहे. (Agnipath Latest Marathi News)

अग्निपथ योजनेमध्ये लष्करात चार वर्षांची सेवा केल्यानंतर केवळ 25 टक्के जवानांना पुढे नियमित सेवा करता येणार आहे. इतरांना निवृत्त व्हावे लागेल. त्यांना अनेक सुविधाही दिल्या जाणार आहे. पण अऩेक युवकांनी या योजनेविरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे बिहारसह अनेक राज्यांमध्ये आगडोंब उसळला आहे.

Kailas Vijayvargiya Latest Marathi News
आता माघार नाही! लष्कराने आंदोलकांना इशारा देत केली महत्वाची घोषणा

या आंदोलनानंतर भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी इंदौर येथे भाजपच्या कार्यालयात माध्यमांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, अग्निवीराच्या रुपाने सेवा दिल्यानंतर जेव्हा ते बाहेर पडतील त्यावेळी त्यांना 13 लाख रुपये मिळतील. तसेच त्यांच्यावर अग्निवीरचा शिक्का पडेल. जर आम्हाला भाजपच्या कार्यालयात सुरक्षारक्षक नेमायचा असेल तर अग्निवीरला प्राधान्य दिले जाईल.

विजयवर्गीय यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली आहे. विजयवर्गीय यांनी अग्निपथ योजनेबाबतच्या शंका दूर केल्या आहेत, असा टोला काँग्रेसनं लगावला आहे. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही ट्विट करत टीका केली आहे. भारतीय तरूणांनी अगिनपथ योजनेला घाबरू नये. चार वर्षांनी भाजपच्या कार्यालयात चौकीदार बनवले जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

अग्निपथ योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांना आता अर्ज करताना लिहून द्यावे लागणार आहे. योजनेविरोधात हिंसा आणि तोडफोड कऱणाऱ्यांमध्ये आपला सहभाग नव्हता, असं अर्जात नमूद करावं लागेल. तसेच आंदोलनादरम्यान FIR दाखल झाल्यास संबंधितांना अग्निवीर होता येणार नाही, असा इशारा लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in