मी पुन्हा येईन! राजीनामा देताच भाजपच्या बड्या नेत्याची घोषणा

संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी मंत्री ईश्वरप्पा हे अडचणीत आले आहेत.
मी पुन्हा येईन! राजीनामा देताच भाजपच्या बड्या नेत्याची घोषणा
K S Eshwarappa with PM Narendra ModiSarkarnama

नवी दिल्ली : कंत्राटदार संतोष पाटील (Santosh Patil) आत्महत्या प्रकरणी कर्नाटकातील (Karnataka) भाजप (BJP) सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा (K. S. Eshwarappa) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अखेर ईश्वरप्पा यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना मोठं शक्तिप्रदर्शन करीत समर्थकांसमोरच मी पुन्हा येईनची घोषणा त्यांनी केली आहे. (Santosh Patil Death Case News)

ईश्वरप्पा यांनी राजीनामा देण्याआधी शक्तिप्रदर्शन करीत विरोधकांना इशारा दिला. शिमोग्यातून ते बंगळूरला निघाल्यानंतर त्यांच्यासोबत समर्थकांच्या ५० ते ६० वाहनांचा ताफा सोबत होता. या वेळी त्यांनी समर्थकांना मी पुन्हा येईनचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याकडे राजीनामा सोपवला. या प्रकरणातून मी निर्दोष सुटेन, असा विश्वासही ईश्वरप्पा यांनी व्यक्त केला आहे. या वेळी त्यांच्या समर्थकांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर जोरदार घोषणाबाजी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी सरकारवर नामुष्की ओढवली आहे. भाजपचा कार्यकर्ता असलेल्या कंत्राटदाराने सरकारमधील एका मंत्र्यावर आरोप करून आत्महत्या केल्याने भ्रष्टाचाराचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला आहे. सुरवातीला या प्रकरणी सरकारने ईश्वरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासही नकार दिला होता. अखेर दबाव वाढल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ईश्वरप्पांचा राजीनामा घेणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. नंतर काही तासांतच ईश्वराप्पांचा राजीनामा घेणार असल्याचे जाहीर करण्याची वेळ त्यांच्यावर आली.

K S Eshwarappa with PM Narendra Modi
खामोश! तृणमूलनं कधीच न जिंकलेल्या जागेवर तीन लाखांच्या मताधिक्यानं मोठा विजय

बेळगाव येथील संतोष पाटील यांच्या कुटुंबीयांना ईश्वरप्पा यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यानुसार ईश्वरप्पा यांच्यासह आणखी दोघांवर संतोष यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाटील हे कंत्राटदार होते. तसेच हिंदू युवा वाहिनीचे राष्ट्रीय सचिव आणि भाजपचे कार्यकर्तेही होते. उडपी येथील एका हॉटेलमध्ये 12 एप्रिलला त्यांचा मृतदेह आढळून आला होता. ही आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मागील काही दिवसांपासून ते बेपत्ता होते.

K S Eshwarappa with PM Narendra Modi
भाजपला मोठा धक्का! पाच पोटनिवडणुकांत मिळाला भोपळा

बेळगावी पोलिसांकडून पाटील यांचा शोध घेतला जात होता. दरम्यानच्या काळात पाटील यांनी त्यांच्या मित्रांना मेसेज केला होता. ईश्वरप्पा हे आपल्या मृत्यूला कारणीभूत असतील, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असं पाटील यांनी म्हटलं होतं. आता त्यांची सुसाईट नोटही पोलिसांना सापडली आहे. तसेच नातेवाईकांनाही तक्रार केल्याने पोलिसांनी ईश्वरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यानंतर ईश्वरप्पा यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. अखेर ईश्वरप्पा यांनी मंत्रिपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.