'प्रसाद' कसा वाटतोय! सिब्बलांनी पक्ष सोडताच जुन्या सहकाऱ्यानं उडवली खिल्ली

कपिल सिब्बल यांनी 16 मे रोजी काँग्रेसला रामराम ठोकला आहे.
'प्रसाद' कसा वाटतोय! सिब्बलांनी पक्ष सोडताच जुन्या सहकाऱ्यानं उडवली खिल्ली
Kapil Sibal, Jitin Prasad Latest Marathi NewsSarkarnama

लखनौ : काँग्रेसमधील नाराज नेत्यांच्या जी 23 गटातील प्रमुख नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी दिली आहे. त्यानंतर त्यांना लगेचच राज्यसभेचीही लॉटरी लागली आहे. समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर त्यांनी मंगळवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांच्या जुन्या सहकाऱ्याने खिल्ली उडवली आहे. (Jitin Prasad Latest Marathi News)

सिब्बल यांनी 16 मे रोजीच पक्षाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी त्यांनी याबाबतचा गौप्यस्फोट केला. त्यानंतर त्यांचे जुने सहकारी व भाजपमध्ये गेल्यानंतर उत्तर प्रदेशात मंत्रिपद मिळालेले जितीन प्रसाद यांनी त्यांना टोला लगावला आहे. प्रसाद यांनी मागील वर्षी जून महिन्यात काँग्रेस सोडली आहे. (Kapil sibal quits Congress)

Kapil Sibal, Jitin Prasad Latest Marathi News
दहा दिवसांपूर्वीच काँग्रेसला रामराम; कपिल सिब्बल यांनी फोडला बॉम्ब

प्रसाद यांनी सिब्बल यांचे एक ट्विटच्या संदर्भ दिला आहे. प्रसाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर सिब्बल यांनी हे ट्विट केलं होतं. 'जितीन प्रसाद भाजपमध्ये गेले. पण प्रश्न हा आहे की त्यांना भाजपकडून 'प्रसाद' मिळेल का किंवा केवळ उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी त्यांना घेतलं आहे,' असं सिब्बल यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

प्रसाद यांनी याच ट्विटचा संदर्भ देत सिब्बलांची खिल्ली उडवली आहे. 'हाऊ'ज द प्रसाद, मिस्टर सिब्बल,' असं प्रसाद यांनी म्हटलं आहे. प्रसाद यांचे हे ट्विट व्हायरल झालं आहे. जवळपास 14 हजार लाईक्स असून साडे तीन हजार जणांनी रिट्विट केलं आहे.

दरम्यान, मागील काही महिन्यांपासून सिब्बल हे सातत्याने काँग्रेसमधील नेतृत्वावरून निशाणा साधत होते. राहुल गांधी व प्रियांका गांधींवर त्यांनी उघडपणे टीका केली होती. नुकत्याच उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबीरातही त्यांची अनुपस्थिती खटकली होती. पण आता त्यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती त्यांनी उघड केली नव्हती.

कपिल सिब्बल यांनी एका मुलाखतीत गांधी कुटुंबावर निशाणा साधला होता. त्यांनी काँग्रेसचे नेतृत्व सोडत इतरांना संधी द्यायला हवी, असं स्पष्ट केलं होतं. राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष नसले तरी तेच निर्णय घेत असल्याची टीकाही सिब्बल यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in