गजानन तिळवेंचा भाजपला धक्का देत काँग्रेसमध्ये प्रवेश

मागील काही दिवसांपासून भाजपला सतत धक्के बसत आहेत.
Gajanan Tilve Joins Congress
Gajanan Tilve Joins CongressSarkarnama

नवी दिल्ली : भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गजानन तिळवे (Gajanan Tilve) यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत रविवारी काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला. भाजपमध्ये (BJP) आता कोणतीही तत्व राहिली नसून केवळ सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टाकी तिळवे यांनी केली आहे.

तिळवे हे गोव्यातील (Goa) भाजपचे नेते आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील इनकमिंग वाढले आहे. गोव्यातील विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव, युवक काँग्रेसचे अध्यक्ष वरद मरडोलकर यांच्या उपस्थित तिळवे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासह संकेत पारसेकर, विनय वैंगणकर, ओम चोडणकर, अमित नाईक, जिओन डियास, बसिल ब्रेगांझा, निलेश धारगळकर, प्रतिक नाईक आणि नीळकंठ नाईक यांनी काँग्रेस हात हातात घेतला.

Gajanan Tilve Joins Congress
गोव्यात भाजपला झटका; बड्या नेत्याचा मंत्रिपदासह आमदारकीचाही तडकाफडकी राजीनामा

काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर तिळवे म्हणाले, सत्तेत येण्यासाठी काहीही करण्याची भाजपची तयारी आहे. भाजपमध्ये आता कोणतीही मुल्य राहिली नाही. हा पक्ष आता बदलला आहे. त्यामुळे भाजप सोडून मी काँग्रेसमध्ये दाखल होत आहे. राज्यात काँग्रेस सत्तेत येऊन सरकार बनवेल, याचा पूर्ण विश्वास आहे, असे तिळवे यांनी स्पष्ट केले.

भाजप नेत्याचा मंत्रिपदाचा राजीनामा

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि घनकचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी मंत्रिपदासह आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. मायकल लोबो यांचा उत्तर गोव्यात मोठा दबदबा असल्याचे मानले जाते. त्यामुळे भाजपसाठी हा धक्का मानला जात आहे. लोबो यांच्यासोबत रेईस मागोस हे नेतेही भाजपला रामराम करण्याची शक्यता आहे. लोबो हे कलंगुट मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. तर मागोस यांना सलीगांव मतदारसंघातून उमेदवारी अपेक्षित आहे. लोबो यांनी अद्याप कोणत्या पक्षात जाणार हे स्पष्ट केलेलं नाही.

Gajanan Tilve Joins Congress
काँग्रेसचा शिवसेनाला धक्का; एकाच दिवसात काढली राऊतांच्या आवाहनातील हवा

राजीनामा दिल्यानंतर लोबो म्हणाले, मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कलंकुट मतदारसंघातील मतदार माझ्या निर्णयाचा आदर करतील, अशी आशा आहे. मी आमदारकीचाही राजीनामा देणार आहे. इतर राजकीय पक्षांसोबत माझी चर्चा सुरू आहे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. मी पक्षांतर्गत कारणांमुळे नाराज होतो. तसेच पक्षाचे कार्यकर्तेही निराश झाले होते, असं लोबो यांनी सांगितले.

दरम्यान, गोव्याचे नगर विकास मंत्री आणि भाजपचे आमदार मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी मागील महिन्यातच मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या सेक्स स्कँडलमध्ये (Sex Scandle) सहभागी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने (Congress) केला होता. त्यानंतर अलीना सलडान्हा (Alina Saldanha) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यांनी आम आदमी पक्षात प्रवेश करत उमेदवारीही मिळवली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com