BJP News : धक्कादायक ; फेसबूक पोस्ट शेअर करीत भाजप नेत्यानं कुटुंबासह जीवन संपवलं..

चारही जण मृतअवस्थेत पडले होते..
Madhya Pradesh News
Madhya Pradesh Newssarkarnama

Madhya Pradesh News : दोन मुले आणि पत्नीसह एका भाजपच्या (bjp) नेत्याने विष पाशन करुन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. ही घटना मध्यप्रदेश येथे घडली आहे. त्यांनी फेसबूक पोस्ट शेअर करीत आत्महत्या करीत असल्याचे सांगितले होते. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Madhya Pradesh News
MNM News : कमल हासन यांचा मोठा निर्णय ; पोटनिवडणुकीत 'या' पक्षाला पाठिंबा

"शत्रुच्या मुलांनाही, देवाने असा आजार देऊ नये. मस्कुलर डिस्ट्रॉफी डीएमडी," असे त्यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या एका नातेवाईकाने ही पोस्ट पाहिल्यावर ते त्यांच्या घरी पोहचले तेव्हा दरवाजा बंद होता. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी चारही जण मृतअवस्थेत पडले होते. त्या चौघांना रुग्णालयात दाखल केले होते.

संजीव मिश्रा असे या भाजप नेत्याचे नाव आहे. विदिशा येथे ते भाजपचे नगरसेवक होते. "दोन्ही मुलांचा मृत्यू हा घरीच झाला होता, तर मिश्रा पती-पत्नी यांचा मृत्यू रुग्णालयात झाला, त्यांनी विष पाशन केले होते,' असे डाँक्टरांनी सांगितले.

Madhya Pradesh News
Thane News : मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचं सूचक विधान ; म्हणाले.." ठाण्यातील नेत्यांची.."

त्यांच्या या फेसबूक पोस्टनंतर अनेकांना मिश्रा यांच्या मुलांच्या या गंभीर आजाराबाबत माहिती मिळाली, असे पोलिसांनी सांगितले. दोन्ही मुलांच्या या गंभीर आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. या आजारात रोगप्रतिकार शक्ती क्षीण होते, तर हाडे कमकुवत होतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com