Devendra Fanavis & Narendra Modi
Devendra Fanavis & Narendra ModiSarkarnama

पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्याचा कट फडणवीसांनी उलगडला..

भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान मोदींच्या रद्द झालेल्या दौऱ्यावरुन कॅाग्रेसवर (Congress) जोेरदार टीका केली आहे.

पुणे : पंजाब दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या दौऱ्यातील त्रुटी या सरकार पुरस्कृत होत्या. हा योगायोग नसून ठरवून केले होते. याबाबत अनेक स्टिंग नुसार काही धक्कादायक खुलासे बाहेर आले आहेत. पंतप्रधान यांच्या दौऱ्यादरम्यान हा असा प्रकार घडणार याबाबत स्थानिक डिएसपीसीआयडी व एसएचओंनी आम्हाला माहिती होती याबाबत सांगितले आहे. मात्र, त्यांना वरिष्ठ पातळीवरुन त्यांना आंदोलनकत्यांवर कारवाई न करण्याचे सांगितले होते. तसेच, एका खलिस्तानी गटाकडून यावेळी पंतप्रधांकडे चप्पल भिरकावणाऱ्यास आम्ही एक लाख डॅालर देवू असे सांगितले होते. मात्र, तरीही यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. या घटनेमागे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा हात होता का? याची चौकशी व्हावी, अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची केली आहे. ते गोव्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

Devendra Fanavis & Narendra Modi
अखेर ठरलं..योगी मथुरेतून नव्हे तर अयोध्येतून!

फडणवीस म्हणाले, पंतप्रधानांचा दौरा हा ब्लू-बुकसारखा असतो. त्याचे नियोजन आधीच केले जाते. वातावरण खराब होऊ शकते त्यामुळे हेलीकॅाप्टर उडणार नाही. यामुळे हा रस्ता वैकल्पिक ठरवण्यात आला होता. याबाबतची माहिती तेथील एका अधिकाऱ्याने सांगितली आहे. हे आंदोलन करणारे हे शेतकरी नसून 250 कट्टरपंथी होते. आम्हाला सुचना मिळाली असती तर, आम्ही त्यांना हटवले असते. मात्र, तश्या सुचना दिल्या गेल्या नाही, असे त्या अधिकाऱ्यांने सांगितले.

पंतप्रधानांच्या दौरा असल्यास येथील सर्व मार्केट बंद असते मात्र, येथील मार्केट सोडा येथील दारूचे दुकाने सुद्धा सुरू होते. या ठिकाणी अतीमहत्वाचे व्यक्ती कधीच थांबत नसतात. अश्या ठिकाणी थांबता येत नाही. अश्या ठिकाणी जगभरात अनेक मोठ्या नेत्यांबाबत वाईट घटना घडल्या आहेत. मात्र, येथे जाणीवपुर्वक हा प्रकार घडवून आणला गेला आहे. तसेच, पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सीएम, सचिव, डी जी यापैकी कोणी नव्हते यावरुन हा प्रकार कसा नियोजित होता, असे सांगत फडणवीसांनी गंभीर आरोप केले आहे.

Devendra Fanavis & Narendra Modi
संजय राऊत बड्या नेत्याच्या भेटीला; UP निवडणुकीत शिवसेना करणार जिवाचं रान

पंतप्रधान ज्या ठिकाणी थांबले ती जागा पाक तोफखान्याच्या रेंज मध्ये होती. या इतक्या गंभीर घटनेबद्दल अज्ञाता विरोधात FRI दाखल केला असून केवळ 283 कलम लावले आहे. याबद्दलची शिक्षा केवळ 200 रूपये इतकीच आहे. कॅाग्रेस आणि पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी म्हणतात की, हा प्रकार गंभीर नव्हता ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार नव्हते. मात्र, त्यांनी लगेचच संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली व सोनिया आणि प्रियंका गांधींना सुद्धा याबाबत माहिती दिली असे कसे घडले. यावर सुद्धा फडणवीसांनी संशय व्यक्त केला.

फडणवीस म्हणाले, कॅाग्रेस नेत्यांनी या घटनेवर बेजबाबदार वक्तव्य केले आहेत. तसेच, याबाबत कॅाग्रेसच्या नेत्यांनी याप्रकरणाला गंभीरतेने घेतले नाही. याबाबतचे सर्व प्रकरण सुप्रिम कोर्टाच्या कमीटीत सर्व बाहेर येईलच मात्र, यांना मोदीजी बद्दलचा यांच्या मनातील व्देष समजला. त्यांनी देशाच्या सैनिकांकडून केलेल्या कारवाईवर सुद्धा वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. झालेल्या या प्रकारात मुख्यमंत्री चन्नी यांना माहिती होती का? याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in