देवेंद्र फडणवीस ७ दिवसांमध्ये पाचव्यांदा दिल्लीत : शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानीही सोबत

Devendra Fadnavis | BJP : सत्ता संघर्षाचे केंद्र आता दिल्ली आणि महाराष्ट्राचे राजभवन
देवेंद्र फडणवीस ७ दिवसांमध्ये पाचव्यांदा दिल्लीत : शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानीही सोबत

दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांना १२ जुलैपर्यंत दिलासा दिल्यानंतर राज्यातील सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचा आधार घेवून राज्यपालांनी सरकारला बहूमत सिद्ध करण्यास सांगावे असे आवाहन केले आहे. दुसऱ्या बाजूला भाजपचे (BJP) सर्वच नेते अगदी वेट अँड वॉचची बचावात्मक भूमिका घेत या सर्व घटनांपासून स्वतःला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मात्र त्याचवेळी दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पडद्यामागून सूत्र हलवताना दिसत आहेत. ते आज सकाळी मागच्या ७ दिवसांमध्ये पाचव्यांदा दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत शिंदे गटाचे वकील आणि राज्यसभेचे खासदार महेश जेठमलानी (Mahesh Jethmanali) देखील आहेत. या दोघांनीही आज देशाचे गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत देशाचे महान्यायवादी (सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया) हे देखील असल्याची माहिती मिळत आहेत.

उद्धव ठाकरेंचे बंडखोरांना माघारी फिरण्याचे आवाहन :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व बंडखोर आमदारांना माघारी येण्याचे आवाहन केले आहे. याबाबत त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी पुन्हा एकदा सर्व आमदारांना परत या, समोर बसा, बोलू, मार्ग काढू असे आवाहन केले आहेत. (Uddhav Thackeray News)

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो

जय महाराष्ट्र !

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो.

कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही, समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.

आपला नम्र,

उद्धव बाळासाहेब ठाकरे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com