संजय राऊतांना गोव्यात कोण ओळखतं? : फडणविसांनी उडविली खिल्ली

शिवसेना गोव्यातील निवडणुकीत भाजपला आव्हान देणारे संजय राऊत (Sanjay Raut) भाजपचे लक्ष्य
संजय राऊतांना गोव्यात कोण ओळखतं? : फडणविसांनी उडविली खिल्ली
Devendra Fadnavis, Sanjay Rautsarkarnama

पुणे : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने आता राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. गोव्याच्या निवडणुकीची (Goa Assembly Election 2022) जबाबदारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) खांद्यावर भारतीय जनता पक्षांने (BJP) टाकली आहे. त्यात शिवसेनेने येथे निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने येथी राजकीय वातावरण तापले आहे. आज गोव्यात फडणवीसांना पत्रकार परिषदेत शिवसेना (Shivsena) नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी संजय राऊतांना गोव्यात कोण ओळखते, अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडविली.

Devendra Fadnavis, Sanjay Raut
पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्याचा कट फडणवीसांनी उलगडला..

फडणवीस म्हणाले, ``संजय राऊतांना गोव्यात कोण ओळखतं? ज्याच्या पक्षाला नोटापेक्षा (NOTA) कमी मत पडतात त्या पक्षाच्या प्रवक्त्याला तुम्ही इतक महत्व का देता? त्यांना नोटापेक्षा जास्त मते पडू द्या. नंतर त्यांची पत्रकार परिषद घ्या.``एकूणच शिवसेनेला फारसे महत्व न देण्याची भूमिका फडणवीस यांनी या वेळी घेतली.

राऊत काय म्हणाले होते?

गोव्यात आमची लढाई नोटांशी आहे. भाजपचे लोक निवडणुकीत नोटांचा पाऊस पाडत आहेत. विशेषतः महाराष्ट्रातून नोटांच्या बॅगा चाललेल्या आहेत. फडणवीसांना माझा शब्द आहे, तुम्ही कितीही नोटा टाका, तुमच्या नोटांशी आम्ही लढू, असे आव्हान त्यांनी दिले होते. त्यांच्या या वक्तव्याचा फडणवीस यांनी समाचार घेतला.

Devendra Fadnavis, Sanjay Raut
जिल्हा बँकेचा अध्यक्ष कोण? निवडीच्या 24 तास आधी नाराज तेली राणेंच्या भेटीला

राष्ट्रवादीचे (NCP) नेते व अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवारांनी आघाडी करुन भाजपला अडचणीत आणण्यासाठी चे रिंगणात उतरले आहेत, असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. यावर बोलतांना फडणवीस म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीवेळी सुद्धा इतर पक्षाच्या नेत्याच्या हातात हात घालून त्यांनी फोटो काढले होते. मात्र, काही परिणाम झाला नाही. त्यांना आपला पराभव होणार नाही याची जाणीव झाली आहे. यासाठी कोण-कोण एकत्र येतील. मात्र त्याचा काही परिणाम होणार नाही.

गोव्यात भाजपमधून होणाऱ्या आऊटगोईंगवर बोलतांना त्यांनी अँटी-इन्कम्बसीमुळे पक्ष आपल्याला तिकीटच देणार नाही, हे काही नेत्यांना समजले होते. त्यामुळेच ते दुसऱ्या पक्षात चालले आहेत. मात्र, पराभूत होणारे लोक भाजपमधून चालले आहेत आणि विजयी होणारे उमेदवार भाजपमध्ये येत आहेत, असा दावा केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in