असंही बक्षीस! भाजपचं सरकार पाडणारा अन् पर्रीकरांचा पराभव करणारा नेता बनला मंत्री

उत्पल पर्रीकरांचा पराभव करणाऱ्या बाबूश यांना भाजपने कॅबिनेट मंत्रिपद दिले आहे.
Atanasio Monserrate
Atanasio Monserrate Sarkarnama

पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे सरकार पाडणाऱ्या आणि त्यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utapal Parrikar) यांचा पराभव करणाऱ्या बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) यांना भाजपनं (BJP) मोठं बक्षीस दिलं आहे. बाबूश यांना भाजपने कॅबिनेट मंत्रिपद दिलं आहे. भाजपने तिकीट नाकारल्याने उत्पल पर्रीकर हे बंडखोरी करीत अपक्ष म्हणून मैदानात उतरले होते. त्यांना हरवणाऱ्या बाबूश यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली.

पणजीच्या जागेवर बाबूश मोन्सेरात हे आधी आमदार होते. आताच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उत्पल पर्रीकर यांचा 657 मतांनी पराभव केला. पर्रीकर यांच्या उमेदवारीवरून मोठा वादंग निर्माण झाला होता. पणजीऐवजी इतर मतदारसंघांचा पर्याय उत्पल यांना देण्यात आला होता. पण त्यांनी पणजीवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला होता. खुद्द अमित शहांनी पर्रीकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण तो प्रयत्न असफल झाला होता. अखेर पर्रीकर विरुद्ध बाबूश अशी लढत झाली होती. आता याच बाबूश यांनी मंत्रिपदाचे बक्षीस भाजपने दिले आहे. त्यांच्या पत्नी जेनिफर मोन्सेरात यांच्या मंत्रिपदासाठीही बाबूश यांनी लॉबिंग केले आहे.

Atanasio Monserrate
शहांनी शब्द पाळला! राणेंना नव्या सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं स्थान

2002 च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात भाजपने 17 जागांवर विजय मिळवला होता. सत्तास्थापन करण्यासाठी त्यांना तीन जागांची गरज होती. यावेळी बाबूश आणि त्यांच्या दोन उमेदवारांच्या पाठिंब्याने भाजपने गोव्यात सत्ता स्थापन केली. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाले पण 2005 मध्ये बाबूश यांनी पाठिंबा काढून घेतला. यामुळे भाजपचे सरकार कोसळले होते. आता भाजपचे सरकार पाडण्यासाठी कारणीभूत ठरलेले बाबूश पुन्हा मंत्री बनले आहेत.

Atanasio Monserrate
गोव्यात भाजपची कोंडी! काँग्रेसने शपथविधीच्या आधी टाकला डाव

मोन्सेरात यांनी 2019 मध्ये काँग्रेसच्या 10 नेत्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. नंतर पर्रीकर यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत त्यांनी पणजीवर विजय मिळवला होता. ते आता पणजीच्या जागेवर मनोहर पर्रीकरांच्या मुलाला हरवून पुन्हा भाजपकडून निवडून आले आहेत. त्यांच्या पत्नी व विद्यमान मंत्री जेनिफर याही ताळगावमधून निवडून आल्या आहेत. बाबूश यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून, अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातही ते आरोपी आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com