मोदींच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच भाजप नेता करू लागला विरोधी पक्षाला फॉलो - bjp leader babul supriyo follow tmc and mukul roy in twitter | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

मोदींच्या मंत्रिमंडळातून डच्चू मिळताच भाजप नेता करू लागला विरोधी पक्षाला फॉलो

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जुलै 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार करताना 12 मंत्र्यांना डच्चू दिला होता. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार करताना 12 मंत्र्यांना डच्चू दिला होता. यामध्ये पश्चिम बंगालमधील भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांचाही समावेश होता. मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर सुप्रियो यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवरुन गदारोळ उडाला होता. आता ते तृणमूल काँग्रेससह मुकुल रॉय यांना फॉलो करु लागले आहेत. त्यामुळे ते तृणमूलच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर सुप्रियो हे राजकारणातून संन्यास घेणार, अशी चर्चा सुरू होती. आता ते तृणमूलच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी ट्विटरवर तृणमूल काँग्रेस आणि मुकुल रॉय यांनी फॉलो करण्यास सुरवात केली आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेल्या मुकुल रॉय यांची नुकतीच तृणमूलमध्ये घरवापसी झाली आहे. सुप्रियो हे त्यांना फॉलो करु लागल्यामुळे त्यांच्या तृणमूल प्रवेशाचा अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे राज्यातील भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

सुप्रियो यांच्याकडे पर्यावरण राज्यमंत्रिपद होते. मंत्रिमंडळ विस्ताराआधी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. याबाबतची माहिती त्यांनी फेसबुकवरून दिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले होते. आपल्याला राजीनामा देण्याबाबत सांगण्यात आले होते, त्यानुसार मी राजीनामा दिला आहे, अशी माहिती त्यांनी सुरूवातीला पोसटमध्ये दिली होती. पण नंतर त्यांनी काही तासांतच बदल केला होता. दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी ही चूक सुधारत आपल्याला राजीनामा मागितला नाही, आपणच दिल्याचे म्हटले होते.

हेही वाचा : अधीररंजन चौधरींची खुर्ची वाचली 

त्यावेळी पहिल्या फेसबुक पोस्टमध्ये सुप्रियो म्हणाले होते की, होय, जेव्हा धूर असतो तेव्हा कुठे ना कुठे आग लागलेली असते. मला राजीनामा देण्याबाबत सांगण्यात आले होते. मला मंत्रिपदाची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार मानतो. भ्रष्टाचाराचा एकही डाग न लागू देता मी आज जात आहे, याचा मला खूप आनंद आहे. मला राजीनामा द्यावा लागला याचं दु:ख आहे पण इतरांसाठी खूप आनंद होत आहे. त्यांना माझ्या खूप शुभेच्छा आहेत, असं सुप्रियो यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख