भाजपच्या नेत्या अपर्णा यादव यांना जीवे मारण्याची धमकी

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अपर्णा यांनी समाजवादी पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
Aparna Yadav
Aparna Yadavsarkarnama

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांची सून भाजपच्या (bjp) नेत्या अपर्णा यादव (Bjp Leader Aparna Yadav) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. (Aparna Yadav latest news)

येत्या ७२ तासात अपर्णा यादव यांना एके-४७ ने जीवे मारण्यात येईल, अशी धमकी देण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. बुधवारी एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन अपर्णा यादव यांना फोन आला. पण त्यांनी तो घेतला नाही.

त्यानंतर काही क्षणातच त्याच मोबाईल क्रमांकावर त्यांना व्हाट्सअप कॉल आला. त्यावर त्यांना मारण्याची धमकी संबधीताने दिली. त्यानंतर अपर्णा यांच्या खासगी सचिवाने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Aparna Yadav
भाजपनं राष्ट्रपतीपदासाठी ‘ते’ नाव पुढं केलं तर पटनाईक नाही म्हणूच शकत नाहीत!

गौतमपली पोलिस ठाण्यातील सायबर सेल ज्या क्रमांकावरुन फोन आला त्या युवकाचा शोध घेत आहे. अपर्णा सिंह या मुलायम सिंह यांचे लहान चिंरजीव प्रतीक यांच्या पत्नी आहे. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अपर्णा यांनी समाजवादी पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजपमध्ये आल्यावर त्यांना उत्तरप्रदेशमध्ये कुठलेही मोठे पद मिळालं नाही, पण राज्यात त्यांची लोकप्रियता वाढत आहे. अपर्णा यादव यांनी २०१७ मध्ये लखनौ येथून कैंट सीट विधानसभा निवडणूक लढवली होती. यात त्यांचा भाजपच्या रिटा बहुगुणा जोशी यांनी पराभव केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in