गोव्यात पाऊल ठेवताच अमित शहा म्हणाले...

मानव संसाधनाचा अभाव असल्याने हे क्षेत्र मागे पडले होते.
गोव्यात पाऊल ठेवताच अमित शहा म्हणाले...
Amit Shahsarkarnama

गोवा : आगामी पाच राज्यातील निवडणुकीच्या पाश्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आज गोवा (Goa Election) दौऱ्यावर होते. भाजपने गोव्यामध्ये पुन्हा सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने डावपेच टाकायला सुरुवात केली आहे. 10 वर्षांच्या काळात राज्य सरकारने खऱ्या अर्थाने गोव्याचा विकास केला. त्यामुळे आगामी निवडणुकीत गोव्यात भाजपचेच सरकार पूर्ण बहुमाताने सत्तेत येणार असल्याचा, विश्सास शहा यांनी यावेळी व्यक्त केला.

Amit Shah
चंद्रकांतदादांनी संयम राखला असता तर शिवसेनेचे 56 आमदार त्यांच्या सोबत असते!

शहा म्हणाले, गोव्याचे सुपुत्र मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. पर्रीकरांच्या पावलांवर पाऊल टाकत डॉ. प्रमोद सावंत काम करत आहेत. पर्रीकरांनी आपल्या जवान बांधवांना 'वन रॅन्क वन पेन्शन' मिळवून दिली आहे. आपल्या जवांनाच्या बलिदानाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. मोदींच्या काळातच पर्रीकरांनी मोठे निर्णय घेतले आहे. यातीलच एक म्हणजे काश्मिरमधील परिस्थिती हाताळण्यासाठी आपल्या सीमांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला, असे शहा यांनी सांगितले.

नॅशनल फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून गोव्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. नॅशनल फॉरेन्सिक सायन्स लॅबची स्थापना करण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला. फॉरेन्सिक सायन्सचा विकास देशामध्ये झाला. मात्र, मानव संसाधनाचा अभाव असल्याने हे क्षेत्र मागे पडले होते. मानव संसाधनावर भर देत फॉरेन्सिक सायन्सचा खऱ्या अर्थाने विकास करण्याचा प्रयत्न मोदी सरकारच्या काळामध्ये सुरु आहे.

Amit Shah
MIM ला मोठे खिंडार, जिल्हाध्यक्षांसह पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

फॉरेन्सिक सायन्सचा अभ्यास करण्यासाठी गोव्यातील मुलांना सरकारने प्रोत्साहित करावे. गोवा देशातील छोटे राज्य आहे, मात्र देशाच्या योगदानामध्ये त्याचा वाटा महत्त्वाचा आहे, असेही शहा म्हणाले. गोव्यात जगभरातून पर्यटक येतात त्यामुळे पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही कटीबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना काळात 100 टक्के लसीकरण करत गोव्याला देशात अग्रेसर बनविले आहे. पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी मोदी सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. भारत सरकारच्या अनेक योजनांचा फायदा गोव्यातील नागरिक घेत असून या योजनांची अमंलबजावणी करण्यासाठी सावंत सरकारने पूर्ण योगदान दिले आहे. तसेच राज्यात 200 मोबाईल टॉवर उभारणे, राज्यातील स्टार्टप्स क्षेत्रातील विकासासाठी महत्त्वाचे योगदान देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटीबध्द आहे.

Related Stories

No stories found.