राहुल गांधींनी मोदींना पाकिस्तान दाखवताच भाजप नेत्यानं थेट महाराष्ट्र दाखवला!

देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मोदी सरकारला आरसा दाखवला होता.
Rahul Gandhi, PM Narendra Modi
Rahul Gandhi, PM Narendra ModiSarkarnama

मुंबई : ऐन उन्हाळ्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे देशात महागाई दिवसेंदिवस वाढू लागली आहे. भारताचे शेजारी असलेल्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या देशांपेक्षा भारतात पेट्रोल महाग असल्याचे दाखवून देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला होता. यावर भाजपचे नेते अमित मालवीय यांनी महाराष्ट्र व गुजराकडे बोट दाखवले आहे. (Petrol Diesel price hike News)

इंधन दरवाढीवरून भाजप नेेते अमित मालवीय (Amit Malviya) महाराष्ट्र आणि राजस्थानकडे बोट दाखवले आहे. या दोन्ही राज्यांत सत्तेत काँग्रेस आहे. ते म्हणाले की, काँग्रेसशासित महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांत पेट्रोल आणि डिझेल सर्वाधिक महाग आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना एलपीजी सिलिंडर आतापेक्षा महाग होता. मागील 8 वर्षांतील एलपीजी सिलिंडरच्या दर तुलनेने कमी आहेत. रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव भडकले असतानाही राहुल गांधी हे आंदोलन करीत आहेत.

Rahul Gandhi, PM Narendra Modi
सैनिकांचं मनोबल खचल्याने रशिया अडचणीत; पुतीन वेगळा मार्ग अवलंबण्याच्या तयारीत

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वाढत्या इंधन दरवाढीवरून मोदी सरकारला आरसा दाखवला आहे. त्यांनी शेजारील देशांतील पेट्रोलच्या दरांची तुलना भारतातील दरांशी केली आहे. शेजारील देशांपेक्षा भारतात पेट्रोल महागडे असल्याचे त्यांनी समोर आणले आहे. त्यांनी म्हटले आहे की, प्रश्न न पूछो ‘फ़क़ीर’ से, कैमरा पर बाँटे ज्ञान। जुमलों से भरा झोला लेकर, लूटे हिंदुस्तान॥

पेट्रोलचे दर भारतीय रुपयांत (₹)

अफगाणिस्तान : 66.99

पाकिस्तान : 62.38

श्रीलंका : 72.96

बांगलादेश : 78.53

भूतान : 86.28

नेपाळ : 97.05

भारत : 101.81

Rahul Gandhi, PM Narendra Modi
हवेवरती पोट भरणारं मशीन येतंय! जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटनं चर्चेला उधाण

सुमारे चार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील 10 दिवसांत 9 वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 6.40 रुपयांनी महागले आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 101.81 रुपये झाला असून, डिझेलचा दर 93.07 रुपये आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 84 पैसे वाढ करण्यात आली आहे. यामुळे मुंबईत डिझेलच्या दराने पुन्हा शंभरी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 116.72 रुपये आणि डिझेलचा दर 100.94 रुपये आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 12 ते 25 रुपयांपर्यंत वाढ होईल, असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com