हिंदुस्थान पेटणार..! भाजप नेत्याकडून राहुल गांधींचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

अग्निपथ योजनेवरून देशातील अनेक राज्यांमध्ये युवक रस्त्यावर उतरले आहेत.
Rahul Gandhi Latest Marathi News
Rahul Gandhi Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या अग्निपथ या योजनेवरून देशातील अनेक राज्यांत आगडोंब उसळला आहे. सैन्यभरतीची तयारी करणाऱ्या युवकांकडून या योजनेला जोरदार विरोध होत आहे. ठिकठिकाणी रेल्वेगाड्या, बसची जाळपोळ केली जात आहे. त्यामुळे जवळपास 15 राज्यांमध्ये ठिकठिकाणी तणावाची स्थिती आहेत. त्यातच भाजपच्या नेत्याकडून राहुल गांधींचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. (Rahul Gandhi Latest Marathi News)

भाजपच्या आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी म्हणत आहेत की, 'आता ही लढाऊ सुरू झाली आहे. येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल, हिंदुस्थान पेटेल.' हा व्हिडीओ काँग्रेसच्या उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबीरातील भाषणाचा आहे. (BJP Leader Amit Malviya criticizes Congress)

Rahul Gandhi Latest Marathi News
राज्यसभा निवडणुकीतील 'त्या' तीन मतांमुळे शिवसेना रूसली; काँग्रेसला बसणार दणका?

व्हिडीओ शेअर करत मालवीय यांनी म्हटलं आहे की, हिंदुस्थानमध्ये आग लागणार, राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या चिंतन शिबीरात देशाला इशारा दिला होता. लंडनमध्येही त्याची पुनरावृत्ती केली. उत्तर प्रदेशात पोलिसांनी सैन्यात भरती होणारे युवक बनून तोडफोड कऱणाऱ्या ज्या लोकांना अटक केले आहे, त्यापैकी अनेक जण काँग्रेसचे नेते आहेत. आग लावली जात आहे,' असं मालवीय यांनी नमूद केलं आहे.

मालवीय यांनी या ट्विटमधून थेट राहुल गांधींकडे बोट दाखवलं आहे. सध्या देशात निर्माण झालेली स्थितीला राहुल गांधी हेच जबाबदार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. दरम्यान, काँग्रेसने अग्निपथ योजनेला विरोध केला आहे. त्यासाठी आज दिल्ली सत्याग्रह केला जात आहे. पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेते यामध्ये सहभागी झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com