Kiran Patel News: किरण पटेल प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाच्या PROच्या मुलासह भाजप नेत्याला अटक

Kiran Patel: पंतप्रधान कार्यालयाचा अधिकारी बनून फिरणाऱ्या तोतया किरण पटेलला पोलिसांनी अटक केली आहे.
Kiran Patel
Kiran PatelSarkarnama

Jammu and Kashmir News: पंतप्रधान कार्यालयाचा अधिकारी असल्याचा बनाव करून झेड प्लस सेक्युरीटीत फिरणारा महाठग किरण पटेल प्रकरणात मंगळवारी मोठी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी दोघांना अटक केली. अमित पंड्या व जय सीतापरा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, मंगळवारी (२१ मार्च) किरण पटेलच्या जामीन अर्जावरील निकाल कोर्टाने २३ मार्चपर्यंत राखून ठेवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित अमित पंड्या गुजरात मुख्यमंत्री कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी हितेश पंड्या यांचा मुलगा असून तो सीसीटीव्ही नेटवर्किंग कंपनी चालवतो. काश्मीरमध्ये उद्योगाचा विस्तार करण्यासाठी तो किरण पटेलची मदत घेत होता. तर जय सीतापरा हा मूळचा राजकोट येथील असून तो भाजपशी संबंधित असल्याची माहिती आहे. या दोघांव्यतिरिक्त तिसरा संशयित त्रिलोक सिंह याचीदेखील चौकशी सुरु असून त्याला केव्हाही अटक होऊ शकते.

Kiran Patel
Manish Sisodiya : 'मुलगा परदेशात, पत्नी आजारी,' सिसोदियांची याचना ; जामिनाला सीबाआयचा विरोध!

दरम्यान, पटेल याच्या तपासादरम्यान अनेक गोष्टींचा खुलासे समोर आले आहेत. पटेल जम्मू- कश्मीरसह उत्तराखंडलाही गेला होता. तिथेही त्याने व्हीव्हीआयपी सुरक्षा मिळवली होती. गुजरातहून आलेल्या व्यक्तीला जम्मू-कश्मीरमध्ये सुरक्षा कशी मिळाली? मीही खासगी सुरक्षेसाठी अर्ज केला होता. परंतु मलाही ती मिळाली नाही, असे प्रतिक्रिया श्रीनगरचे न्यायदंडाधिकारी राजा मोहंमद यांनी दिली.

तर अमित पांड्याकडे सरकारी सीसीटीव्हीची कंत्राटे असून तो भाजप उत्तर झोन सोशल मीडिया प्रभारी आहे. तो गुजरातमधील गांधीनगरच्या राजकोटमध्ये सेफ सोल्यूशन नावाची कंपनीचा मालक. सरकारी टेंडरमध्ये ही कंपनी मोठ्या प्रमाणात काम करत असल्याची माहितीही समोर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com