Karnataka BJP News : भाजपच्या काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट होणार ; आज पत्ते खुले होणार..; येदियुरप्पा म्हणाले..

BJP Karnataka Candidates List : १७० ते १८० उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे.
BJP  Karnataka Candidates List  news update
BJP Karnataka Candidates List news updateSarkarnama

Karnataka Assembly Election 2023 bjp candidates list : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप आज (सोमवारी) सांयकाळी पहिली उमेदवारी यादी जाहीर करणार आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Election) काँग्रेस, जेडीएस आणि आम आदमी पक्षाने आपल्या उमेदवारीची यादी जाहीर केली आहे. आता भाजप उमेदवारांच्या यादीकडे सगळ्याचे लक्ष आहे.

याबाबत भाजप संसदीय बोर्डचे सदस्य, माजी मुख्यमंत्री बी.एस. येदियुरप्पा यांनी कुणाला तिकीट मिळणार, कुणाचे तिकीट कापले जाणार याबाबत अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. ते नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या काही नेत्यांना उमेदवारी मिळणार असल्याचे भाजपच्या विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.

BJP  Karnataka Candidates List  news update
Maharashtra Politics : 'मातोश्री' वर चाललयं काय ? ; मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याची घरवापसी ?

येदियुरप्पा म्हणाले, "आज सांयकाळी पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. यात १७० ते १८० उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. उमेदवारी यादीला अंतिमरुप देण्यासाठी आज पुन्हा एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक विद्यमान आमदारापैकी काही जणांचे तिकीट कापले जाणार आहेत. तर अन्य पक्षातून आलेल्या काही जणांना उमेदवारी देण्यात येणार आहे,"

BJP  Karnataka Candidates List  news update
Rajasthan Politics News : गेहलोत-पायलट संघर्ष पुन्हा पेटला ; आपल्याच सरकारविरोधात पायलटांनी ठोकला शड्डू

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे शिगगांव येथून रिंगणात उतरणार असल्याचे निश्चित झाले आहे. २००८ मध्ये ते याच मतदार संघातून ते निवडून आले आहे. तर येदियुरप्पा यांचे सुपुत्र बीवाई विजयेंद्र हे शिकारीपुरा येथून निवडणूक लढविणार असल्याचे समजते.

काल (रविवारी) केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्लीत भाजपच्या मुख्य कार्यालयात झाली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महासचिव बीएल संतोष, केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य उपस्थित होते. कर्नाटक भाजपच्या कोअर ग्रुपने प्रत्येक विधानसभेसाठी तीन नावांची निवड केली आहे. ही तीन नावे केंद्रीय निवडणूक समितीसमोर ठेवण्यात आली. यातून एकाला उमेदवारी जाहीर होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com