भाजपनं शिवसेनेला पुन्हा डिवचलं; ‘एनडीए’च्या बैठकीचं शिंदे गटाला निमंत्रण!

‘एनडीए’ने बोलावल्या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून दीपक केसरकर दिल्लीला जाणार आहेत
NDA Meeting
NDA MeetingSarkarnama

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (एनडीए NDA) दिल्लीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या बैठकीचे शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला भाजपकडून (BJP) निमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिंदे गटही या बैठकीला हजेरी लावणार असून सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत. या बैठकीचे निमंत्रण देऊन भाजपने शिवसेनेला (Shivsena) विशेषतः उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा डिवचलं आहे. (BJP invites Eknath Shinde's group to NDA meeting)

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर शिवसेना अधिकृतरित्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडली होती. त्यानंतर शिवसेनेचा एनडीएशी संबंध राहिला नव्हता. मात्र, शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे गटाला मात्र एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण सन्मानाने देण्यात आले आहे. ते देऊन भाजपकडून शिवसेना नेतृत्वाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

NDA Meeting
प्रतिनियुक्तीवरील अतिरिक्त अधिकाऱ्यांना परत बोलवा : महेश लांडगेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर ‘यूपीए’कडून भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. या निवडणुकीत एनडीएचे पारडे जड वाटत असले तरी मूळचे भाजपचे असलेले सिन्हा कशी लढत देतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.

NDA Meeting
आमदार जयस्वालांच्या माणसांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा भाजप नेत्याचा आरोप...

दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी ‘एनडीए’कडून एक विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. यात मतदानासंदर्भात चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. याच बैठकीला शिवसेनेतून बाहेर पडून भाजपच्या साहाय्याने राज्यात स्थापन करण्यात आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला सन्माने बोलविण्यात आलेले आहे. शिंदे गटाला बैठकीचे निमंत्रण देऊन भाजपने एक प्रकारे शिवसेना तथा उद्धव ठाकरे यांना डिवचल्याचं बोललं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in