Presidential Election : भाजपनं भारती पवार अन् विनोद तावडेंना लावलं कामाला

निवडणुकीच्या व्यवस्थापनासाठी भाजपने चौदा जणांची टीम तयार केली आहे.
Presidential Election 2022 news, Vinod Tawade News, Bharati Pawar News
Presidential Election 2022 news, Vinod Tawade News, Bharati Pawar NewsSarkarnama

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्वसहमतीचा उमेदवार ठरविण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. भाजपसाठी ही निवडणूक फारशी कठीण नसली तरी मित्रपक्षांसह सर्व विरोधी पक्षांशीही संवाद साधत उमेदवार निश्चित करण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी आता भाजपने 'मॅनेजमेंट टीम' तयार केली आहे. संपूर्ण निवडणुकीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी या टीमवर असणार आहेत. (Presidential Election 2022 news updates)

राष्ट्रपती पदाची निडणूक १८ जूलै रोजी होणार आहे. २९ जूनपर्यंत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. त्यासाठी भाजपने (BJP) तयार केलेल्या व्यवस्थापन टीममध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Bharati Pawar) आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) या महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा समावेश आहे. तावडे आणि भाजपचे सरचिटणीस हे दोघे या टीमचे सहनिमंत्रक आहेत. तर केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत टीमचे निमंत्रक आहेत. एकूण 14 जणांची ही टीम काम करणार आहे.

Presidential Election 2022 news, Vinod Tawade News, Bharati Pawar News
उपमुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला; अमित शहांनी घेतली आंदोलनाची दखल

व्यवस्थापन टीममध्ये केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, अश्विनी वैष्णव, सर्वानंद सोनोवाल, केंद्रीय राज्यमंत्री अर्जून राम मेघवाल, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, तरूण चुघ, राष्ट्रीय उपाध्यक्ष डी. के. अरूणा, राष्ट्रीय सचिव ऋतुराज सिन्हा, महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्य7ा वनती श्रीनिवासह, राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आणि आसामचे उपाध्यक्ष खासदार राजदीप रॉय यांचाही समावेश आहे.

दरम्यान, भाजपने सर्व मित्रपक्ष व विरोधी पक्षातील नेत्यांशी चर्चा करण्याची जबाबदारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (rajnath singh) यांच्यावर सोपवली आहे. राजनाथ सिंह हे सध्या सर्वानुमते योग्य उमेदवार देण्यासंदर्भात चाचपणी करत आहेत. भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये रणनिती आखण्यात येत आहे. विरोधकांकडून मोर्चे बांधणी करण्यात येत असताना भाजपकडून उमेदवारावर एकमत करण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांशी संपर्क साधण्यात येत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांना राजनाथ सिंह यांनी फोन केला होता. उद्धव ठाकरे-राजनाथ सिंह यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली आहे, हे दोन्ही नेते भेटणार असल्याची समजते. या चर्चेमध्ये राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे.

राजनाथ सिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशीसुद्धा काल फोनवर चर्चा केली असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरेंकडे राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती पदाबाबत समर्थन देण्याची मागणी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com