भाजपशासित मध्य प्रदेशात दारु स्वस्त! करात कपातीचा मोठा निर्णय

दारूची विक्री वाढवण्यासाठी शिवराजसिंह चौहान सरकारनं लढवली शक्कल
Liquor
LiquorSarkarnama

भोपाळ : महाराष्ट्र (Maharashtra) सरकारने सरकारने विदेशातून आयात होणाऱ्या दारुवरील (Imported Liquor) उत्पादन शुल्कात तब्बल 50 टक्के कपात केली होती. यावरून भाजपने (BJP) सरकारला धारेवर धरले होते. आता भाजपशासित मध्य प्रदेशने (Madhya Pradesh) बिअर व वाईनरील आयात शुल्कात कपात केली आहे. यामुळे तिथे आता दारू स्वस्त होणार आहे.

मागील वर्षी महाराष्ट्र सरकारने दारूवरील आयात शुल्क कमी केल्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. भाजप नेत्यांनी सरकारला लक्ष्य केले होते. हे सरकार महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र करीत आहे, अशी टीकाही केली होती. आता भाजपचीच सत्ता असलेल्या मध्य प्रदेश सकारने दारू स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. बिअर व वाईनवरील आयात शुल्कात कपात करण्यात आली आहे. याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. बिअरवरील आयात शुल्क प्रतिलिटर 30 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आले आहे. वाईनवरील आयात शुल्कही प्रतिलिटर 10 रुपयांवरून 5 रुपये करण्यात आले आहे.

Liquor
मुख्यमंत्र्यांना दिल्लीतील निवासस्थान खाली करावं लागणार! लोकसभा सचिवालयाची नोटीस

मध्य प्रदेशात बिअर शॉपींच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. आधी राज्यात 1 हजार 200 बिअर शॉपी होत्या. आता तब्बल साडेतीन हजार बिअर शॉपी आहेत. यामुळे राज्यात बिअरची विक्री वाढली आहे. विक्री वाढल्याने सरकारचा महसूल वाढला असून, सरकारने आयात शुल्क कमी करून बिअर आणखी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विक्रीत आणखी वाढ होऊन महसूलही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

Liquor
पंतप्रधानपद गेल्यानंतर इम्रान खान आक्रमक; मुदतपूर्व निवडणुकांसाठी उतरले रस्त्यावर

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने दारुवरील गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आयात शुल्कात कपात केली होती. याबाबत उत्पादन शुल्क विभागाने अधिसूचना काढली होती. यानुसार, विदेशातून आयात झालेल्या स्कॉच व्हिस्कीच्या एक लिटरच्या बाटलीची किंमत 5 हजार 800 रुपये ते 14 हजार रुपयांदरम्यान असेल तर त्यावरील कर 35 ते 40 टक्के कमी करण्यात आला. विदेशातून आयात होणाऱ्या दारूतून राज्य सरकारला 2016-17 ते 2018-19 या कालावधीत 200 कोटी रुपये उत्पादन शुल्क मिळाला होता. परंतु, 2019-20 ते 2020-21 या कालावधीत हा उत्पादन शुल्क 100 कोटी रुपयांवर आला होता. विक्री करात वाढ झाल्याने ही घट झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com