निष्ठेचं फळ! मुख्यमंत्र्यांसाठी आमदारकीवर पाणी सोडणाऱ्या नेत्याला राज्यसभेचं बक्षीस

मुख्यमंत्र्यांसाठी चार वेळा निवडून आलेला मतदारसंघ सोडला होता
निष्ठेचं फळ! मुख्यमंत्र्यांसाठी आमदारकीवर पाणी सोडणाऱ्या नेत्याला राज्यसभेचं बक्षीस
Radha Mohan Agarwal and Narendra Modi Sarkarnama

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अयोध्या आणि मथुरा या मतदारसंघांकडे पाठ फिरवली होती. त्यांनी सुरक्षित अशा गोरखपूर (शहर) मतदारसंघातून विधानसभा निवडणूक (Assembly elections) लढवून विजय मिळवला होता. पण यासाठी गोरखपूरमधील विद्यमान आमदाराला या जागेचा त्याग करावा लागला होता. आता या नेत्याला आमदारकीवर पाणी सोडल्याच्या बदल्यात थेट राज्यसभेची लॉटरी लागली आहे. (Rajya Sabha Election News Updates)

उत्तर प्रदेशात भाजपने ज्येष्ठ नेत्याला त्याच्या निष्ठेचं फळ दिलं आहे. राज्यसभेसाठी भाजपने उत्तर प्रदेशातील सहा जणांची यादी जाहीर केली आहे. डॉ.राधामोहनदास अग्रवाल (Radha Mohan Das Agarwal) यांचा समावेश आहे. अग्रवाल हे चार वेळा गोपखपूर शहर मतदारसंघाचे आमदार होते. विधानसभा निवडणुकीत पक्षानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लढवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अग्रवाल यांनी कोणताही विरोध न करता पक्षाचा निर्णय स्वीकारला. त्यांनी योगींसाठी मतदारसंघावर पाणी सोडल होतं. आता त्यांना राज्यसभेच्या रुपानं याचं बक्षीस मिळालं आहे.

राज्यातून उमेदवारी जाहीर झालेल्या इतर पाच जणांमध्ये लक्ष्मीकांत वाजपेयी, सुरेंद्रसिंह नागर, बाबूराम निषाद, दर्शना सिंह आणि संगीता यादव यांचा समावेश आहे. भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी 8 राज्यांतील 16 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात सर्वाधिक सहा जागा उत्तर प्रदेशातील आहेत. राज्यात भाजप सात जागा आरामात जिंकू शकतो तर आठवी जागाही लढवू शकतो. पण या दोन जागांबाबत भाजपने अद्याप पत्ते खुले केलेले नाहीत.

Radha Mohan Agarwal and Narendra Modi
पोलिसांनी सुरक्षा काढून घेतली अन् 24 तासांतच काँग्रेस नेत्याची हत्या

योगींनी गोरखपूरमधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने तेथील विद्यमान भाजप आमदार राधामोहन अगरवाल यांचा पत्ता कट झाला होता. त्यावेळी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अग्रवाल यांना खुली ऑफर दिली होती. पण त्यांनी ती नाकारली होती. भाजप नेतृत्वाने योगींना गोरखपूर (शहर) मतदारसंघातून उभे करण्याचा निर्णय घेतला होता. गोरखपूर हा योगींचा बालेकिल्ला आहे. त्यांनी गोरखपूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजय मिळवला आहे.

Radha Mohan Agarwal and Narendra Modi
वडिलांच्या भाजपबाबतच्या गौप्यस्फोटावर संभाजीराजेंनी थेटच सांगितलं...

योगींनी आधी विधानसभा निवडणूक लढवलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी मथुरेतून निवडणूक लढवावी, असा आग्रह होता. मात्र, योगींचा कल अयोध्येकडे होता. मात्र, राज्यातील पूर्व भागातील नेते भाजप सोडून जाण्याचे प्रमाण वाढल्याने नेतृत्वाने योगींनाच गोरखपूरमधून लढवण्याचा निर्णय घेतला होता. गळती रोखण्याचे मोठे आव्हान पक्ष नेतृत्वासमोर होते. राज्यातील बदलती राजकीय समीकरणे पाहता योगींनाच गोरखपूरमधून लढवून भाजप नेतृत्वाने सुरक्षित खेळी खेळली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in