राहुल गांधींचा लखीमपूर खिरी दैारा हे केवळ राजकीय पर्यटन ; भाजपचा घणाघात
giriraj singh, rahul gandhisarkarnama

राहुल गांधींचा लखीमपूर खिरी दैारा हे केवळ राजकीय पर्यटन ; भाजपचा घणाघात

राहुल गांधी (rahul gandhi) यांनी या घटनेतील मृत पत्रकारांच्या कुटुंबाला का भेट दिली नाही, असा सवाल गिरीराज सिंह (giriraj singh) यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना उपस्थित केला.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी लखीमपूर खिरी (lakhimpur khiri violence) येथील कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भेटीबाबत गंभीर आरोप केला आहे. ''राहुल गांधी यांचा लखीमपूर खिरी दैारा हा फक्त राजकीय पर्यटन आहे, '' अशी टीका गिरीराज सिंह यांनी केली आहे.

ज्या ज्या ठिकाणी कॉग्रेस आणि अन्य विरोधी पक्षाना संधी मिळते तेथे ते आपल्या राजकीय पर्यटनासाठी जात असतात. राहुल गांधी यांचा लखीमपूर खिरी दैारा हा राजकीय पर्यटनाचा नमूना आहे. यात त्यांची खरी सहानुभूती आणि करुणा दिसत नाही. राहुल गांधी (rahul gandhi) यांनी या घटनेतील मृत पत्रकारांच्या कुटुंबाला का भेट दिली नाही, असा सवाल गिरीराज सिंह (giriraj singh) यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना उपस्थित केला.

राहुल गांधी हे लखीमपूर खिरी प्रकरणातील मृत्यांच्या कुटुंबियांना भेटायला जातात, पण कश्मीरमध्ये जे लोक मारले गेले त्यांच्याबाबत राहुल गांधींना सहानुभूती नाही. कश्मीरमध्ये ज्या लोकांचा मृत्यू झाला तेथे राहुल गांधी का गेले नाही, असा सवाल गिरीराज सिंह यांनी उपस्थित केला आहे.

giriraj singh, rahul gandhi
वक्फ बोर्डाची जमीन लाटणाऱ्या अप्पर जिल्हाधिकाऱ्याला अटक

या घटनेननंतर राहुल गांधी यांनी म्हटलं होते की नरेंद्र मोदी सरकार शेतकऱ्यांवर आक्रमण करीत आहे. त्यांना जीपखाली चिरडले जात आहे, शेतकऱ्यांची हत्या केली जाते. तर दुसरीकडे या प्रकरणात आरोपी हा राज्यमंत्र्याचा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर मोदी सरकार कारवाई करीत नाही.

लखीमपूर खिरी हिंसाचारानंतर कॉग्रेने भाजपबाबत आक्रमकपणे भूमिका घेतली आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारामागे षंडयंत्र असल्याचा आरोप कॉग्रेसने केला आहे. याप्रकरणी काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या 7 सदस्यीय शिष्टमंडळासह (congress delegation) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे भेटीची मागणी केली आहे. यासाठी राष्ट्रपतींना (ram nath kovind) पत्र लिहिलं आहे. लखीमपूर खिरी हिंसाचारातील वस्तूस्थिती कॉग्रेस राष्ट्रपतींसमोर मांडणार आहे.

Related Stories

No stories found.