महापालिका, नगर परिषदेत भाजपचाच डंका; विरोधकांचा सुफडा साफ

आगरतळा महापालिकेतील 51 वॉर्डपैकी भाजपने 37 वॉर्डमध्ये विजय मिळवत बहूमत सिध्द केलं आहे.
महापालिका, नगर परिषदेत भाजपचाच डंका; विरोधकांचा सुफडा साफ
BJPsarkarnama

आगरतळा : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ऐतिहासिक विजय मिळवून त्रिपुराचा (Tripura) गड सर करण्यासाठी निघालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना जोरदार झटका बसला आहे. भाजपनं (BJP) बंगालमधील पराभवाचा वचपा त्रिपुरामध्ये काढत ममतांना धूळ चारली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Civic polls) निवडणूकीत बहुतेक ठिकाणी भाजपनं विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे.

त्रिपुरा राज्यात भाजपची सत्ता आहे. पण येथील आगरतळा महापालिकेस इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तृणमूलने प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. या राज्यात 2023 मध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीवर डोळा ठेवून ममतांनी त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. भाजपसह काँग्रेसमधील काही नेत्यांनाही त्यांना गळाला लावले आहे. तसेच निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराचा मुद्दाही तृणमूलने उचलून धरला होता. सर्वोच्च न्यायालयापर्यंत हा मुद्दा पोहचला होता. त्यामुळे या निवणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

BJP
ड्रग्ज प्रकरणात न्यायालयाकडून झटका; 'एनसीबी'कडे ठोस पुरावेच नाहीत!

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, आगरतळा महापालिकेतील 51 वॉर्डपैकी भाजपने 37 वॉर्डमध्ये विजय मिळवत बहूमत सिध्द केलं आहे. काही वॉर्डातील मतमोजणी अद्याप सुरू आहे. अगरतलासह सहा नगर पंचायत आणि 13 नगर परिषदांमध्येही भाजपचाच डंका असल्याचे समजते. याठिकामी 25 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत तृणमुल व कम्युनिस्ट पक्ष भाजपच्या जवळपासही पोहचले नाहीत. काही ठिकाणी तर खातेही खोलता आलेली नाही.

2018 मध्ये राज्यात सत्तेत आल्यानंतर भाजप पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे गेले आहे. मुख्यमंत्री बिप्लव देव या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवण्यात आल्या. मतदानापुर्वीच 334 पैकी 112 ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 222 जागांसाठी 785 उमेदवार रिंगणात होते.

भाजप, तृणमूल, भारतीय कम्यूनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) या पक्षांमध्ये तिरंगी लढत झाली. तृणमूलने भाजपवर टीका करताना या निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणीही केली होती. निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर मतमोजणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने मोठा बंदोबस्त ठेवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in