भाजपनं आता आपल्याच खासदारांना घातल्या टोप्या!

सत्तारूढ भाजपने ((BJP) आज आपल्याच पक्षाच्या खासदारांना टोप्या घातल्या आहेत.
BJP New Cap
BJP New Cap Sarkarnama

नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपने ((BJP) आज आपल्याच पक्षाच्या खासदारांना टोप्या घातल्या. आजच्या संसदीय बैठकीला आलेल्या प्रत्येक भाजप खासदाराला एक किट देण्यात येत होते. त्यात नेमकं काय आहे, ही उत्सुकता खासदारांना होती. अखेर त्यात एक भगव्या रंगाची टोपी व एक शक्तीवर्धक बूस्टर चॉकलेट बार असल्याचे समोर आले. यामुळे आपल्याच खासदारांना टोपी घातल्याची चर्चा सुरू झाली. हे किट गुजरातच्या एनर्जी बार कंपनीने बनवले आहे. (BJP New Cap News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अहमदाबादमध्ये नुकताच एक रोड शो केला होता. त्यावेळी त्यांनी भगव्या रंगाची टोपी परिधान केली होती. ही कमळ चिन्हांकित नवी भगवी टोपी सगळ्या खासदारांना देण्यात आली आहे. आगामी काळात ही टोपी भाजपची नवी ओळख बनणार आहे. भारतीय राजकारणात टोपीचे महत्व कायम राहिले आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील खादीची गांधी टोपी, नंतर बराच काळ काँग्रेस नेत्यांच्या डोक्यावर कायम राहिलेली तशीच टोपी, जयप्रकाश नारायण आंदोलनातील खास टोपी, डाव्या कार्यकर्त्यांची प्रसिध्द टोपी अशा अनेक टोप्यांचे भारतीय राजकारणात वेगळे स्थान आहे.

BJP New Cap
महागाईवर विचारताच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचं काँग्रेस अन् गांधी परिवाराकडं बोट!

नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत मोदींनी समाजवादी पक्षाच्या लाल टोपीवर शेरेबाजी केली होती. ही लाल टोपी नव्हे हा तर रेड सिग्नल आहे, सावध रहा, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांचा हा इशारा जनतेने गंभीरपणे घेतल्याचे निकालातून सिध्द झाले. आता निकाल लागल्यानंतर खुद्द मोदींच्याच नेतृत्वाखालील भाजपने रंग बदलून ही नवी टोपी वापरात आणली आहे. ही टोपी भाजपच्या लोकसभा-राज्यसभेच्या चारशेहून अधिक खासदारांना आज देण्यात आली.

BJP New Cap
राजकारण तापलं! 'आप'नं डाव टाकताच भाजपचा प्रतिडाव

ही टोपी सत्तारूढ खासदारांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी बालसुब्रममण्यम यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या संसदीय कार्यालयावर सोपवण्यात आली आहे. आगामी काळात भाजपच्या कार्यक्रमात पक्षाची ओळख असलेले उपरणे पक्षनेत्यांना भेट दिले जाईल. त्यासोबत ही नवी भगवी टोपीही दिली जाईल, असा संदेश यानिमित्ताने देण्यात आला आहे. ही नवी भगवी टोपी देण्यामागी कारण समजले आहे. मात्र, खासदारांना एनर्जी बार देण्यामागील गूढ अद्याप कायम आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com