भाजप जिल्हाध्यक्ष वर्षाविहारासाठी गेले अन् बुडता बुडता वाचले...

MP News| BJP| गणेशोत्सवानिमित्त जिल्हाध्यक्ष राकेश सिंह आपल्या तीन साथीदारांसह गणपती मंदिरात दर्शनासाठी आले होते
MP News| BJP
MP News| BJP

भोपाळ : देशभरात अनेक राज्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. आसाममध्ये अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाल्यानंतर आता मध्य प्रदेशातही पावसाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. अतिवृष्टीमुळे मध्य प्रदेशातील नद्या, नाले आणि धरणे ओसंडून वाहत आहेत. असे असताना मध्य प्रदेशातील भाजपचे (BJP) विदिशा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राकेश सिंह जदौन यांच्यासह तिघे जण बेतवा नदीत बुडता बुडता वाचल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेचे प्रत्यक्षदर्शी महेश सोनी यांनी स्थानिक माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवानिमित्त जिल्हाध्यक्ष राकेश सिंह आपल्या तीन साथीदारांसह गणपती मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शनानंतर राकेश जदौन, तेजिंदर सिंग बन्नू आणि बासोदा येथील कार्यकर्ता यशपाल सिंह रघुवंशी हे बेतवा नदीवर असलेल्या धरणावर वर्षाविहारासाठी गेले होते. वर्षाविहार करता करता ते खोल खोल पाण्यात गेले. पण अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांना बाहेर पडता येईना. त्यांनी मदतीसाठी हाक मारल्यानंतर होमगार्डच्या पथकाने त्यांचे प्राण वाचवले. राकेश सिंह यांनी गंभीर अवस्थेत आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. होमगार्डच्या जवानांच्या अथक प्रयत्नांनी तिघांनाही सुखरुपपणे पाण्याच्या बाहेर काढले.

MP News| BJP
हरियाणातील नेत्याने आपला पक्ष केला राष्ट्रवादीत विलीन!

मध्य प्रदेशात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. नद्या आणि नाले तुडुंब भरले आहेत, निवासी वसाहतीमध्येही अनेक फुटांनी पाणी भरले आहे. अनेक लोकांचे स्थालांतर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर जाहीर कऱण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. त्यामुळे नर्मदा, चंबळ, बेतवा, शिप्रा यासह सर्व लहान-मोठ्या नद्यांना पूर आला आहे. नर्मदापुरममधील सुखतवा नदीच्या पुलावर पाणी आल्याने भोपाळ-नागपूर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. राजधानीतील अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या असून पाणी भरल्यावर बोटींचा सहारा घ्यावा लागतो. येथील परिस्थिती पाहता जिल्हा प्रशासनाने मंगळवारीही शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in