राऊतांना आता तरी समज आली पाहिजे, सेनेची काय अवस्था केली ? फडणवीसांचा टोला

कितीवेळा दिल्लीला जाताय? किती वेळा? मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील. ठिक आहे. भाजपचे राज्य आहे.
Sanjay Raut,  Devendra Fadnavis    Latest news
Sanjay Raut, Devendra Fadnavis Latest news Sarkarnama

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis)यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत. यावरुन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळी फडणवीसांवर टीका केली होती. त्याला फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिले आहे.फडणवीस दिल्ली येथे माध्यमांशी बोलत होते. (devendra fadnavis latest news)

आज सकाळी संजय राऊतांनी फडणवीसांवर टीका केली. ते म्हणाले, "आधी सरकार स्थापन करा. एक महिन्यामध्ये हम दोनो, एक दुजे के लिए याच स्क्रिप्टमध्ये अडकून पडला आहात. कितीवेळा दिल्लीला जाताय? किती वेळा? मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील. ठिक आहे. भाजपचे राज्य आहे. ते म्हणत असतील शिंदेगट शिवसेना आहे. पण नाही. शिवसेना काल पैठणला दिसली, या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे,"

Sanjay Raut,  Devendra Fadnavis    Latest news
Smriti Irani : भाजप मंत्री स्मृती इराणींच्या समर्थनार्थ शिवसेना खासदार मैदानात

राऊतांविषयी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, "संजय राऊतांना आता तरी समज आली पाहिजे. त्यांनी पक्षाची काय अवस्था करून टाकलीय. विरोधकांचं कामच असतं टीका करण्याचं. त्यांच्या असंवेदनशीलतेमुळेच ही परिस्थिती आली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लवकरच निर्णय होईल, काळजी करू नका,"

देवेंद्र फडणवीस यांनी काल (शनिवारी) शिवसेनचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्याला राऊतांनी आज प्रत्युत्तर दिले. ते माध्यमांशी बोलत होते.

"राज्यातील जनतेला संजय राऊतांनी वैताग आणला. शिवसेनेच्या जनतेला त्यांनी वैताग आणला. सगळ्यांना त्यांनी वैताग आणला. त्यामुळे सगळ्यांनी मिळवून ठरवलं की, हे 'लाऊडस्पीकर' बंद करायचं असेल तर सत्ता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही,"अशा शब्दात फडणवीसांनी काल राऊतांची खिल्ली उडवली .

काल फडणवीस हे राऊतांबाबत बोलत असताना सभागृहातील कार्यकर्त्यांकडून जोरजोरात घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी फडणवीसांनी संजय राऊत यांचे आभार मानण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com