ओवेसींसमोर याच मातीतून छत्रपती शिवराय उभे राहतील : भाजपचा पलटवार

भाजपने औवैसी (Asaduddin Owaisi) यांना प्रक्षोभक भाषणाबद्दल आव्हान दिले आहे.
Asaduddin Owaisi

Asaduddin Owaisi

Sarkarnama

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश निवडणूक (Uttar Pradesh Election) प्रचारा दरम्यान स्थानिक पोलिकांना धमकी दिल्याचा आरोप होणारे एमआयएमचे नेते असदुद्दिन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर भारतीय जनता पक्षाने, मियॉं, कोणाला धमकावत आहात' असे विचारून जोरदार प्रतिहल्ला चढविला आहे. ओवेसींसारख्या प्रवृत्तींना नेस्तनाबूत करण्यासाठी याच मातीतून पुन्हा छत्रपती वीर शिवाजींसारखी व्यक्तिमत्वे जन्माला येतील असेही भाजपने म्हटले आहे.

हरिद्वार येथील मेळाव्यातील भावना भडकावणाऱया भाषणांंबाबत ज्येष्ठ भाजप नेते बोलण्याचे टाळतात. ओवेसी यांच्यावर द्वेषपूर्ण भाषणे केल्याब्दल पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी अशी मागणी यूपी भाजपने केली आहे.

Asaduddin Owaisi

आमदार नितेश राणे, हाजिर हो! पोलिसांनी नोटीस धाडल्यानं राजकारण तापलं

ओवेसी यांनी कानपूर येथील जाहीर सभेत उत्तर प्रदेश पोलिसांना जाहीर धमकी दिल्याचा आरोप होत आहे. ‘मोदी व योगी हे कधी ना कधी सत्तेतून जाणार आहेत. तेव्हा आम्ही तुमचा हिशोब करू. आम्ही तुम्हाला विसरणार नाही‘ असे ओवैसी यांनी भाषणात म्हटल्याचा आरोप होत आहे. यावर, भारताचे रक्षण करण्यास भोलेनाथ व प्रभू श्रीराम समर्थ आहेत. यावेळी अशा ‘गिधाडांचा‘ पूर्ण इलाज होईलच असा इशारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या माध्यम सल्लागार विभागाने ट्विटद्वारे दिला आहे. केंद्रीय मंत्री मुख़्तार अब्बास नक़वी यांनी, अशा प्रकारची जातीयवादी मानसिकता लोकशाही भारतात जनता कदापी स्वीकारणार नाही असे भाकीत केले आहे.

Asaduddin Owaisi

Parliament session 2021 : संसद अधिवेशन गुंडाळले

भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांनी, ‘धमक्या कोणाला देत आहात मियॉंं?‘ असा सवाल विचारला आहे. पात्रा म्हणाले की ज्या ज्या वेळी या देशाच्या वीरभूमीवर कोणी औरंगजेब किंवा कोणी बाबर येईल तेव्हा तेव्हा आमच्या याच मातृभूमीतून कोणी ना कोणी वीर शिवाजी, महाराणा प्रताप व मोदी-योगी उभे रहातील हे तुम्ही लक्षात ठेवा.आम्ही मुघलांनाही घाबरलो नव्हतो व सध्याच्या जिननावाद्यांनाही घाबरत नाही. आम्ही तुम्हाला काय घाबरणार, असेही पात्रा म्हणाले.

हरिद्वारच्या घटनेवर बोलत असलेले धर्मनिरपेक्षतेचे सारे ठेकेदार ओवेसींच्या जिन्ना वादी मानसिकतेवर पूर्ण मौन बाळगतात. कारण हिंदूंना धमक्या देणारा त्यांच्या लेखी धर्मनिरपेक्ष असतो तर जय श्रीराम चे नाव घेणे धर्मांध व जातीयवादी ठरते असे भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी म्हटले. पूनावाला यांनी सांगितले की छोटा ओवेसी (अकबरुद्दीन) पोलिस १५ मिनीटांसाठी हटवा अशी धमकी देतो तर त्याचा मोठा भाऊ पोलिसांना खुलेआम धमक्या देतो असेही पूनावाला यांनी सांगितले.

Asaduddin Owaisi

ओमिक्राॅमचे भारतात फक्त 400 रुग्ण तरी अख्खा देश धास्तावलाय!

उत्तर प्रदेशाचे मंत्री मोहसीन रझा म्हणाले की ओवेसी सात्तयाने बहुसंख्यांक समाजाला घाबरवण्याचे काम करत आहेत. त्यांना वेसण गालण्याची वेळ आली आहे. तालिबानी मानसिकता प्रबळ ठरायला भारत हा अफगाणिस्तान नाही हे ओवैसी यांनी लक्षात ठेवावे. जरी कोणी तालिबानी आला तरी देशात मोदी व राज्यात योगी आहेत. जर बहुसंख्यांकांनी रौद्र रूप दाखवले तर ओवेसी कोठे जातील ?

निवडणुकीच्या प्रचारात भाषेची सभ्यता व वाणीसंयम राखणे ही सर्वच पक्षांची त्यातही प्रमुख नेत्यांची जबाबदारी आहे. तिचा विसर पडला की त्याची किंमत समाजाला चुकवावी लागते असे निरीक्षण राजकीय विश्लेषक सईद अंसारी यांनी नोंदवले आहे. पोलिसांना जाहीर धमकी देणे भारतीय समाजात कधीही स्वीकार्ह होणार नाही, असेही अन्सारी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com