गोपालगंजमध्ये भाजपचा विजय; ओवेसींनी घेतला तेजस्वी यादवांचा बदला

Bihar Politics : बिहारमध्ये दोन विधानसभा जागांसाठी पोट निवडणूक झाली
Asaduddin Owaisi Tejashwi Yadav
Asaduddin Owaisi Tejashwi Yadavsarkarnama

Bihar Politics : बिहारमधील मोकामा आणि गोपालगंज या दोन विधान सभेच्या जागांसाठी पोटनिवडणूक झाली. दोन्ही ठिकाणी आरजेडीचे उमेदवार रिंगणात होते. बिहारमध्ये जेडीयू आणि आरजेडीने महाआघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. दरम्यान, आरजेडीने मोकामा जागा सहज जिंकली, पण गोपालगंज जागेवर भाजपने (BJP) आपली पकड कायम ठेवली आहे.

Asaduddin Owaisi Tejashwi Yadav
धामनगरमध्ये भाजपचा दणदणीत विजय; नवीन पटनायक यांच्या पक्षाचा पराभव करत जागा राखली

गोपालगंज जागेवर रोचक लढत झाली. भाजपने ही जागा सुमारे दोन हजार मतांनी जिंकली पण राजदच्या (Rjd) पराभवाचे कारण असदुद्दीन ओवेसी होते. त्यांच्या पक्ष AIMIM ला 12 हजार आणि BSP ला आठ हजार मते मिळाली. म्हणजेच या दोन पक्षांमुळे मतांची विभागणी झाली आहे. विशेषतः ओवेसींमुळे मुस्लिम मतांची विभागणी झाली. तेजस्वी यांनी ज्या पद्धतीने ओवेसींचा पक्ष आरजेडीमध्ये विलीन केला, त्याचा बदला ओवेसींनी घेतला, असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे.

ओवेसींनी तेजस्वी यादव यांना धक्का देण्याची ही पहिलीच वेळ नाही. बिहार विधानसभा निवडणुकीतही ओवेसींनी सीमांचल, म्हणजे पूर्णिया, कटिहार, किशनगंज आदी भागात चांगली पकड निर्माण केली होती. पाच जागा जिंकल्या होत्या. याशिवाय 10 हून अधिक जागांवर राजदचे नुकसान झाले होते.

Asaduddin Owaisi Tejashwi Yadav
हिमाचलमध्ये बंडखोरांनी भाजपला घेरलं; थेट पंतप्रधांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी फोन केला?

अलीकडेच तेजस्वी यांनी ओवेसींच्या पक्षातील सर्व आमदारांना आपल्या पक्षात घेत बिहारमध्ये ओवेसींचा पक्ष संपवला होता. याचा बदला ओवेसींनी तेजस्वी यांच्याकडून घेतल्याचे बिहारच्या राजकारणातील जाणकारांचे मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com