धामनगरमध्ये भाजपचा दणदणीत विजय; नवीन पटनायक यांच्या पक्षाचा पराभव करत जागा राखली

Assembly by-election News : ओडिशातील (Odisha) भद्रक जिल्ह्यातील धामनगर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला आहे.
BJP
BJP Sarkarnama

Assembly by-election News : ओडिशातील (Odisha) भद्रक जिल्ह्यातील धामनगर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला आहे. नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांच्या बिजू जनता दलाचा (Bjd) पराभव करून भाजपने धामनगर जागा राखली आहे. भाजपचे विद्यमान आमदार बिष्णू चरण सेठी यांचे १९ सप्टेंबर रोजी निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती.

BJP
Bihar By-Election : बिहारचा सामना बरोबरीत; पण भाजपचे मताधिक्य घटले

भाजपचे (BJP) उमेदवार सूर्यवंशी सूरज यांनी बीजेडीचे उमेदवार अबंती दास यांचा ९ हजार ८८१ मतांनी पराभव केला. सूर्यवंशी सूरज यांना एकूण 80 हजार 351 तर अबंती दास यांना 70 हजार 470 मते मिळाली. भाजपने विद्यमान आमदारांच्या मुलांना उमेदवारी दिली होती. त्यांना याजागेवर सहानुभूती मिळाल्याचा दावा, बीजेडीने केला आहे.

BJP
तेलंगणात टीआरएसने भाजपला चारली धूळ; केसीआर यांनी गड राखला

या पोटनिवडणुकीत पाच उमेदवारांमध्ये लढत होती. मात्र, सत्ताधारी बिजू जनता दलाचे (बीजेडी) उमेदवार अंबाती दास आणि पक्षाचे बंडखोर नेते आणि अपक्ष उमेदवार राजेंद्र दास यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये भाजपच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. देशातील सहा राज्यात सात विधानसभा जागांवर पोट निवडणूक झाली. त्यामध्ये धामनगरच्या जागेवर सर्वांचे लक्ष लागले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com