मोदी-शहांचं पोस्टर लावूनही भाजप उमेदवाराला मिळालं फक्त एक मत...

उमेदवारानं प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची पोस्टर्स लावत विरोधी उमेदवारासमोर आव्हान उभं केलं होतं.
मोदी-शहांचं पोस्टर लावूनही भाजप उमेदवाराला मिळालं फक्त एक मत...
D. Kartik, BJP

चेन्नई : निवडणुकांमध्ये अनेकदा विजयी उमेदवारांपेक्षा पराभूत उमेदवारांचीच चर्चा अधिक होते. अशीच जोरदार चर्चा तमिळनाडूत सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला केवळ एकच मत मिळालं आहे. या निवडणुकीत उमेदवारानं प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांची पोस्टर्स लावत विरोधी उमेदवारासमोर आव्हान उभं केलं होतं. पण प्रत्यक्षात त्यांना केवळ एकच मत मिळालं.

विशेष म्हणजे, या उमेदवाराच्या घरात पाच सदस्य आहेत. त्यानंतरही केवळ एकच मत मिळाल्यानं सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. डी. कार्तिक असं या उमेदवाराचं नाव आहे. कोईम्बतूर जिल्ह्यातील पंचायत निवडणुकीत ते उमेदवार होते. अनेकांनी त्यांना मिळालेल्या एका मतानंतर खिल्ली उडवली आहे. सोशल मीडियात #Singal_Vote_BJP हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

D. Kartik, BJP
पक्ष सोडण्याच्या वाटेवर असलेल्या नेत्याला मानाचं पान दिल्यानं भाजपमध्ये नाराजी

तमिळनाडूमध्ये 6 व 9 ऑक्टोबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक पार पडली. यामध्ये 79 हजार 433 उमेदवारांनी 27 हजार 3 जागांसाठी आपलं नशीब आजमावलं. कार्तिक यांनी या निवडणुकीत प्रचारात आघाडी घेतली होती. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा यांच्या प्रतिमांचाही प्रचारात समावेश केला होता. आपल्या भाषणांमध्ये मोदी-शहांचा उल्लेख करून मतदारांना आकर्षित करत होते. पण प्रत्यक्षात त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे निवडणूक निकालावरून दिसून आलं.

D. Kartik, BJP
भाजपनं डच्चू दिलेल्या मनेका गांधी अखेर बोलल्या...

डी. कार्तिक यांनी घरात पाच सदस्य असूनही एकच मत मिळाल्याचं कारण सांगितलं आहे. घरातील इतर चार सदस्यांचं मतदान अन्य वॉर्डात असल्यानं त्यांना मी उभा असलेल्या वॉर्डात मतदान करता आले नाही, असं कार्तिक यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, डी. कार्तिक सध्या सोशल मीडियात भलतेच ट्रेंड होत आहेत. लेखिका मीना कंदासामी यानीही याबाबत ट्विट केलं आहे.

भाजप उमेदवाराला केवळ एकच मत मिळालं आहे. त्यांच्या घरातील इतर चार सदस्यांचा अभिमान वाटतो, त्यांनी इतर उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय घेतला, असा खोचक टोला कंदासामी यांनी लगावला आहे. काँग्रेसचे अशोक कुमार म्हणतात, घरात पाच सदस्य असूनही भाजप उमेदवाराला केवळ एकच मत मिळालं आहे. तमिळनाडूमध्ये भाजपची काय स्थिती आहे, यावरून स्पष्ट होतं.

Related Stories

No stories found.