महाराष्ट्रात लोकसभेच्या ८ जागांवर भाजपचे मायक्रो प्लॅनिंग; ३ केंद्रीय मंत्र्यांवर जबाबदारी

BJP | Maharashtra : या मतदारसंघांची जबाबदारी प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांना वाटून देण्यात आली आहे.
PM Narendra Modi, Devendra Fadnavis Latest Marathi News
PM Narendra Modi, Devendra Fadnavis Latest Marathi NewsSarkarnama

(Narendra Modi latest News)

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत २०१४ आणि २०१९ च्या विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपने 'मिशन २०२४' ची आखणी केली आहे. यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या करिष्म्याच्या जोडीलाच विजयासाठी संघटनात्मक बांधणीकडेही लक्ष देण्यास भाजपने (BJP) सुरुवात केली आहे. याच नियोजनाचा एक भाग म्हणून पक्षाने देशभरातील अशा १४४ जागांवर २०२४ मध्ये जोर लावण्याचे ठरविले आहे जेथे भाजप उमेदवार गत निवडणुकांमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. या मतदारसंघांची जबाबदारी प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांना वाटून देण्यात आली आहे. (BJP Latest News)

मुंबईसह महाराष्ट्रातील भाजपने असे ८ मतदारसंघ निवडले असून या मतदारसंघांची जबाबदारी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार गिरीश महाजन यांच्यासह स्थानिक आमदार, भाजप कार्यकर्ते व संघ प्रचारक यांच्याशी समन्वय साधून या नेत्यांनी या मतदारसंघांत भाजपचा खुंटा बळकट करायचा आहे.

या जागांवर संबंधित मंत्र्यांनी दर दोन ते तीन महिन्यांनी प्रत्येकी किमान ३ दिवस मुक्काम करावा व मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार प्रसारही करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच तेथील कमकुवत बूथ व विधानसभा मतदारसंघांचाही आढावाही त्यांनी घ्यायचा आहे. याशिवाय राज्यातील शिवसेना खासदारांच्या मतदारसंघांवरही विशेष फोकस ठेवण्याचे भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे नियोजन आहे. कारण सेनेचे खासदार २०१९ मध्येही मोदींच्याच नावावर लोकसभेत पोहोचल्याचा पक्षाचा दावा आहे.

भाजपने ‘मिशन १४४‘ मधील साऱ्या जागांची विभागणी ४० उपविभागांत केली आहे. यात सर्वाधिक १९ जागा पश्चिम बंगाल व १५ जागा उत्तर प्रदेशातून येतात. यात ओडिशातील १३ व तेलंगणातील १२ मतदारसंघांचा समावेश आहे. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या उत्तर प्रदेशमधील रायबरेली मतदारसंघाची जबाबदारी कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्यावर तर मुलायमसिंह यादव यांच्या मतदारसंघाची जबाबदारी पीएमओचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्यार टाकण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com