गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत नड्डांची मोठी घोषणा; या नावावर शिक्कामोर्तब

पुढील वर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापैकी गोवा हे एक राज्य आहे.
BJP are going forward with him Pramod Sawant as CM face
BJP are going forward with him Pramod Sawant as CM face

पणजी : पुढीलवर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रविवारी मोठी घोषणा केली आहे. गोव्याच्या दौऱ्यावर असलेल्या नड्डा यांनी सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेच या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, असं जाहीर केलं. सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यात चांगलं काम केल्याचं प्रशस्तिपत्रकही नड्डा यांनी दिलं. (BJP are going forward with him Pramod Sawant as CM face)

नड्डा हे शनिवारी गोव्यामध्ये दाखल झाले आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी मंत्री, आमदारांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. तसेच विविध विकासकामांची पहाणीही केली. त्यानंतर रविवारी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत घोषणा केली. सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांनी पक्षांतर्गत हेवेदावे अन् नेतृत्व बदलाच्या चर्चेला पुर्णविराम दिला.

हेही वाचा : घोटाळेबाज ठेकेदारांना आयुक्तांचा दणका; महिलेसह सात अधिकाऱ्यांना अटक

नड्डा म्हणाले, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी खूप चांगलं काम केलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा चोहोबाजूने विकास होत आहे. त्यामुळं आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांनाच पुढे करणार आहोत. भाजपमध्ये संसदीय मंडळाकडून अधिकृत घोषणा केली जाईल. पण इतर कोणत्याही नावाचा विचार करण्याची सध्या गरज नाही, अशा शब्दांत नड्डा यांनी सावंत यांच्या नावाला पसंती दर्शवली. 

मी कॅबिनेट मंत्री, आमदार, खासदार आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांशी वेगवेगळ्या पातळीवर चर्चा केली. मागील साडे चार वर्षांत गोव्यामध्ये भाजपमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. मी याबाबत खूप समाधानी असून आत्मविश्वास आला आहे. काँग्रेसमधून अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्याशीही माझी चर्चा झाली आहे. त्यांनीही भाजपच्या कामाचं कौतूक केलं आहे, असं नड्डा म्हणाले. 

सावंत यांनी मार्च 2019 मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला 40 पैकी 30 जागा मिळतील, असा दावा भाजपकडून केला जात आहे. सरकारच्या कामगिरीमुळे हे शक्य होणार असल्याचे नेत्यांकडून सांगितले जात आहे. पुढील वर्षी पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापैकी गोवा हे एक राज्य आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com