भाजप आणि राष्ट्रवादीचं ठरलं होतं पण शिवसेनेला काहीच माहिती नव्हतं!

BJP | Shivsena | NCP : भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची २०१७ मध्ये युती होणार होती
BJP | Shivsena | NCP
BJP | Shivsena | NCPSarkarnama

मुंबई : भाजप (BJP), शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) २०१७ मध्ये युती होणार होती, असा गौप्यस्फोट भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी नुकताच केला आहे. तसेच त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती न झाल्याचे आता प्रायश्चित घेतोय, असं वक्तव्य आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. या दोन्ही वक्तव्यांवरुन महाराष्ट्राचा राजकारणात चर्चांना उधाण आला आहे.

मात्र याबाबत शिवसेनेला काहीही माहित नसल्याचा खळबळजनक दावा शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेला या दोन पक्षांचे छुपे काय सुरु होते याबाबत आपल्याला तरी माहित नव्हते. पण त्यावेळी महापालिकेच्या निवडणुका होत्या, आणि भाजप-शिवसेनेची युती महापालिका निवडणुकांसाठी तुटल्या होत्या. त्यामुळे भाजपला मित्राची गरज होती, म्हणून या युतीच्या चर्चा सुरु असाव्यात असा दावाही ठाकरे यांनी केला. लोकसत्ता वृत्तपत्राच्या दृष्टी आणि कोन’ या वेब-उपक्रमाचा समारोप मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संवादाने होत आहे. यावेळी ते बोलत होते.

BJP | Shivsena | NCP
गुजरात भाजपचे बडे नेते PM मोदींच्या भेटीला; विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करणार?

याबाबत ABP माझाच्या एका कार्यक्रमात बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, २०१७ च्या संदर्भात मी म्हटलं की, बीत गई वो बात गई. पण आशिष शेलार यांनी जे सांगितलं आहे त्यावर एवढंच सांगतो की, २०१७ चा प्रयत्न काँग्रेसला एकटं पाडण्यासाठी होता. देशभरात नॉन काँग्रेस पक्षांना एक करण्याचा प्रयत्न चालला होता. त्या प्रयत्नाचा तो एक भाग होता. तो बऱ्यापैकी यशस्वीही होत होता. पण त्यावेळी शिवसेना नको, असा एक प्रश्न आला. पण आम्हाला शिवसेना (Shiv Sena) हवी होती. त्यामुळे तो निर्णय होऊ शकला नाही.

BJP | Shivsena | NCP
PM मोदी उद्यापासून युरोप दौऱ्यावर : ६५ तासांत तब्बल २५ बैठकांचे व्यस्त वेळापत्रक

सुधीर मुनगंटीवार यांच्याही वाक्यावर फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. फडणवीस म्हणाले, 'प्रायश्चित नाही. अगदी शब्दावर जाऊ नये. त्यांच्या बोलण्याचा अर्थ एवढाच होता की, मित्र आहे म्हणून आम्ही शिवसेनेशिवाय युती करणार नाही, हा निर्णय घेतला. त्यांच्यावर जेव्हा वेळ आली त्यावेळी त्यांनी धोका दिला, असे फडणवीस यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com