भाजपचं अखेर ठरलं अन् नितीशकुमारांनी उचलली मंत्रिमंडळ विस्ताराची पावले

बिहारमध्ये सत्ताधारी भाजप आणि जेडीयूमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. आता मात्र, भाजपने नितीशकुमार यांनी गोंजारण्याची भूमिका घेतली आहे.
bjp adn jdu agress finally tries to reconcile with each other in bihar
bjp adn jdu agress finally tries to reconcile with each other in bihar

पाटणा : बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) सरकार सत्तेवर आहे. जेडीयूचे संख्याबळ कमी असूनही, नितीशकुमार हे मुख्यमंत्रिपदी आहेत. मागील काळात दोन्ही पक्षांतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. अखेर दोन्ही पक्षांतील वरिष्ठ नेत्यांनी पुढे येत एकमेकांवर शाब्दिक टिप्पणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भाजपने पुढाकार घेतला होती. आता भाजपने मंत्रिमंडळ विस्ताराची घाई सुरू केली आहे. 

बिहारमधील भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी दोन्ही पक्षांमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जेडीयूचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष आर. सी. पी. सिंह यांच्याशी यादव यांनी चर्चा केल्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांवर टीका न करण्याचे ठरवले. किती दिवस दोन्ही पक्षाचे नेते हे पाळतात आगामी काळात स्पष्ट होईल. भाजप आणि जेडीयूतील नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक सुरू केल्याने आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर  आले होते. 

अरुणाचल प्रदेशमध्ये जेडीयूच्या सात आमदारांना भाजपने फोडले होते. तेव्हापासून दोन्ही पक्षांत नाराजी सुरु होती. यावरुन जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत भाजपला थेट इशारा देण्यात आला होता.यानंतर बिहारमधील कायदा व सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून नितीश कुमार सरकारवर भाजपने टीका सुरू केली होती. आम्ही कोणाच्याही दारात निमंत्रण घेऊन उभे नव्हतो, असा टोलाही आर. सी. पी. सिंह यांनी भाजपला लगावला होता. 

या वादाच्या पार्श्‍वभूमीवर भूपेंद्र यादव यांनी नितीशकुमार यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली. जेडीयूबरोबर राहून सरकार चालविण्याचा पक्ष नेतृत्वाचा संदेश यादव यांनी नितीशकुमार यांना दिला. यावर सरकार चालवण्यात जेडीयूकडून कोणतेही अडथळे आणले जाणार नाहीत किंवा गैरसमज निर्माण केले जाणार नाहीत, असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, दोन्ही पक्षात समझोता झाला असला तरी यामागे भाजपला असलेली मंत्रिमंडळ विस्ताराची घाई कारणीभूत आहे. नितीशकुमार आणि यादव यांच्यात चर्चा झाल्यानंतर भाजप व जेडीयूमधील गैरमसज दूर झाल्याच्या दावा करण्यात आला आहे. यानंतर भूपेंद्र यादव यांनी येत्या १५ -१६ तारखेला बिहारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे सूतोवाच केले आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com