कॅप्टनच्या फ्रेंड रिक्वेस्टला 24 तासांतच भाजपचा रिप्लाय!

अमरिंदरसिंग यांनी काँग्रेस विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपशी आघाडी करण्याची तयारी सुरू केली आहे.
Amarinder Singh and Narendra Modi
Amarinder Singh and Narendra ModiFile Photo

नवी दिल्ली : पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्री (Chief Minister) पदावरून हटवल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांनी काँग्रेस विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करून भाजपशी (BJP) आघाडी करण्याची तयारी सुरू केली आहे. यामुळे पंजाबमधील राजकीय वातावरण तापले आहे. कॅप्टनने घातलेल्या मैत्रीच्या हाकेला भाजपनेही 24 तासांतच उत्तर दिले आहे.

कॅप्टन यांच्या पक्षस्थापनेच्या हालचालींना पंजाबचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांनी अकाली दलाचे विविध गटांना सोबत घेण्यासाठी पावले उचलली आहेत. असे असले तरी सर्वच राजकीय पक्ष याबाबत सावध प्रतिक्रिया देत आहेत. पुढील वर्षाच्या सुरवातीला पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. यामुळे आतापासूनच सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कॅप्टन यांनी भाजपकडे मैत्रीचा हात पुढे केल्यानंतर याला 24 तासांत उत्तर मिळाले आहे.

याबाबत बोलताना भाजपचे पंजाब प्रभारी दुष्यंत गौतम म्हणाले की, आम्ही अमरिंदरसिंग यांच्याशी आघाडी करण्यास तयार आहोत. आमचे दरवाजे आघाडीसाठी कायम खुले आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय मात्र, आमचे संसदीय मंडळ घेईल. देशाभिमानी, देशाविषयी आणि राष्ट्रीय सुरक्षेविषयी काळजी असणाऱ्या गटांसोबत हात मिळवण्यासाठी भाजप सदैव तयार आहे.

Amarinder Singh and Narendra Modi
देशातील पेट्रोल, डिझेलच्या भडक्यावर पेट्रोलियममंत्री म्हणाले...

अमरिंदरसिंग यांचे माध्यम सल्लागार रविन ठुकराल यांनी नव्या पक्षाच्या स्थापनेबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे. अमरिंदरसिंग यांनी अजून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली नाही. पण त्यांनी यापूर्वीच काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले होते. ठुकराल यांनी ट्विट करत त्याबाबत स्पष्ट संकेत दिले. 'पंजाबच्या भविष्याची लढाई आता सुरू झाली आहे. पंजाबमधील लोकांच्या सेवेसाठी तसेच मागील वर्षभरापासून आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी माझ्या राजकीय पक्षाची घोषणा लवकरच केली जाईल,' असे ठुकराल या ट्विटमध्ये करण्यात आलेली आहे.

Amarinder Singh and Narendra Modi
पेट्रोल, डिझेलची दरवाढ रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी उचललं मोठं पाऊल

दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. पण त्यासाठी एक अट घालण्यात आली आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाबाबत तोडगा निघाल्यास भाजपसोबत जागावाटप केले जाईल, असं अमरिंदरसिंग यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच समविचारी पक्षांशीही आघाडी केली जाईल. त्यामध्ये अकाली दलातून फुटलेले काही गट प्रामुख्याने धिंडसा आणि ब्रम्हपुरा आदी गटांची नावे घेत त्यांनी काँग्रेस व अकाली दलाविरोधात दंड थोपडले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com