Kejariwal Government : दिल्लीत दारू धोरणावरून भाजप-आप मध्येच जुंपली

Arvind kejariwal Government| BJP| दिल्लीतील नवीन अबकारी धोरण राज्य सरकारने रद्द केल्यावर जागोजागी उघडलेल्या शेकडो दारू दुकानांना आठवडाभरापासून टाळे लागले आहे.
Arvind kejariwal Government| BJP|
Arvind kejariwal Government| BJP|

नवी दिल्ली : दिल्लीतील अनधिकृत ठेकेदारांना व अनधिकृत भागांत दारूची दुकाने उघडण्यास परवानगी देण्याबाबत माजी उपराज्यपाल अनिल बैजल यांनी अचनाक भूमिका बदलली. त्यामुळे दिल्ली सरकारला कोट्यवधी रूपयांचा फटका बसला, असा गंभीर आरोप सत्तारूढ आम आदमी पक्षाने (AAP) आज (६ ऑगस्ट) केला.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने दिल्लीची ‘मद्यशाळा‘ बनविताना काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदारांना दारू दुकाने उघडण्याचे ठेके सर्रास वाटले, असा पलटवार भाजपने केला. यामुळे रद्द करावे लागलेल्या नवीन अबकारी धोरणावरून आप व भाजप पुन्हा आमनेसामने आले आहेत. दिल्लीतील नवीन अबकारी धोरण राज्य सरकारने रद्द केल्यावर जागोजागी उघडलेल्या शेकडो दारू दुकानांना आठवडाभरापासून टाळे लागले आहे.

Arvind kejariwal Government| BJP|
Amit Shaha news| राममंदिर भूमीपूजनाच्या वर्धापन दिनीच कॉंग्रेसचे मुद्दाम आंदोलन; शहांचा आरोप

दिल्लीतील अबकारी धोरणात दारू दुकानांना परवाने देण्यात दिल्ली सरकारने दारू माफियांशी हातमिळवणी करून कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. हे मंत्रालय सांभाळणारे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा यात थेट सहभाग आहे, असा भाजप सातत्याने आरोप करत आहे. सिसोदिया यांच्या सीबीआय चौकशीचीही मागणी भाजपने लावून धरली आहे. त्यांना केंद्र सरकार कधीही अटक करू शकते अशी शक्यता मुख्यमंत्री केजरीवाल यांनी वारंवार व्यक्त केली आहे. सिसोदिया हे अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून टीम केजरीवालचा हिस्साच नव्हेत तर ते केजरीवाल यांचे उजवे हात मानले जातात. गुजरात, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत दमदार पावले टाकणाऱ्या आपचे खच्चीकरण करण्याचा भाजप नेतृत्वाचा एक उपाय म्हणजे सिसोदिया यांची संभाव्य अटक हा असेल, अशी भिती आप कडून व्यक्त होत आहे.

सिसोदिया यांनी आज सांगितले की, या साऱ्या प्रकाराची सविस्तर माहिती सीबीआयकडे पाठविण्यात आली आहे. दिल्लीच्या नवीन अबकारी धोरणानुसार अनधिकृत क्षेत्रासह विविध भागांत ८४९ दारू दुकाने उघडण्यात येनार होती. आधी याला विरोध केल्यावर बैजल यांनी आपले धोरण बदलले, प्रस्तावावर कोणताही आक्षेप घेतला नाही व धोरणाला मंजुरी दिली. त्यामुळे राज्य सराकरला कोट्यवधी रूपयांचा फटका बसला. यावर बैजल यांनी तातडीने प्रतीक्रिया दिलेली नाही.

Arvind kejariwal Government| BJP|
तिथं तुमचं हिंदुत्व' जागृत होत नाही; राणेंच्या इशाऱ्याला रोहित पवारांचे उत्तर

दरम्यान दिल्ली सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांनाही सरसकट दारू दुकाने उघडण्यास परवानगी दिली. शाळा-रूग्णालये यांच्याही अगदी जवळ दारू दुकानांचा सुळसुळाट झाला असा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे. ते म्हणाले की सिसोदिया यांनीदारू कंपन्यांचे १४४ कोटी रूपये कोणाचाही परवानगी न घेता परस्पर माफ करून टाकले. याच सिसोदिया यांनी आता वादग्रस्त अबकारी धोरणावर ‘सफेद झूठ' बोलणे थांबवावे. कारण उपराज्यपाल बैजल यांनी नियमांच्या विरूध्द जाऊन कोणतेही काम केलेले नाही . त्यांनी नियमांच्या आधारेच निर्णय घेतले आहे. सिसोदिया-केजरीवाल यांनी आपल्या गैरधोरणाचे खापर उपराज्यपालांवर फोडू नये. नवे बकारी ओदरम केजरीवाल सरकारला रद्द करावे लागले म्हणजेच त्या धोरणात खोट होती. आता यातील गैरव्यवहाराचे धागेदोरे थेट सिसोदिया यांच्यापर्यंत पोचल्याने ते वाट्टेल ते आरोप करत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in