‘गजाआडच्या मसाज' वरून दिल्लीत महाभारत : आप-भाजप आमने-सामने

AAP-BJP Politics | गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या कॅबिनेट मंत्र्याचा तिहार जेलमधील एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकारण रंगले आहे.
Satyendra jain latest news
Satyendra jain latest newssarkarnama

AAP-BJP Politics नवी दिल्ली : मनी लाँड्रिंगच्या आरोपात दिल्लीतील कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन सध्या तिहार तुरुंगात आहेत. मात्र जेलमधील त्यांचा मसाजचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सध्या दिल्लीत राजकारण रंगले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने (BJP) आम आदमी पक्षाला कोडींत पकडले आहे.

भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आदेश गुप्ता आणि भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषदेत आप'वर सडकून टिका केली आहे. 'आप हा पक्ष नाही तर बदनाम पक्ष आहे. पैसा, भ्रष्टाचार आणि गैरप्रकार हा यांचा ‘यूएसपी‘ बनला असून जैन यांच्या ताज्या भानगडीवर केजरीवाल यांचे मौन गंभीर असल्याची टीका गुप्ता यांनी केली आहे. तर, एखादी व्यक्ती गुन्हेगार म्हणून कारागृहामध्ये शिक्षा भोगत असताना त्या व्यक्तीला मसाजसारख्या सुविधा पुरवून ‘आप' व केजरीवाल चुकीचा पायंडा पाडत असल्याची टीका भाजप नेते श्याम जाजू यांनी केली आहे.

Satyendra jain latest news
पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, सावरकरांचे योगदान विसरता येणार नाही..

यावरुन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीदेखील भाजपवर निशाणा साधला आहे. ‘न्यायालयाने मनाई करूनही हा व्हिडीओ जारी करणारा भाजप आता खालच्या पातळीवर उतरला आहे. एखाद्या व्यक्तीच्या आजारपणाची अशी खिल्ली उडवून यांना गुजरात-दिल्लीच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने हे केले असल्याचा दावा सिसोदिया यांनी केला आहे.

गेल्या ६ महिन्यांपासून सत्येंद्र जैन तुरुंगात आहेत. याच काळात त्यांच्या मणक्याला दुखापत झाली आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयाची काही कागदपत्रे दाखवून सिसोदिया यांनी दावा केला की डॉक्टरांनी जैन यांना फिजिओथेरपीची गरज असल्याचे लिहिले आहे, त्यामुळे त्यांच्यावर मसाज उपचार सुरू आहेत. पण असा व्हिडीओ जारी करून भाजप लज्जास्पद, क्षुद्र राजकारण करत असल्याचा घणाघात सिसोदिया यांनी केला आहे. तसेच,

जैन यांच्या आजारपणाची खिल्ली उडवून भाजपला निवडणुका जिंकायच्या असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. दिल्ली महापालिका (एमसीडी) निवडणुकीतच नव्हे तर गुजरातमध्येही आपकडून पराभव होणार असल्याचे लक्षात आल्यावर असे प्रकार करणे हे त्यांची (भाजपची) त्यांची भीती आणि स्वस्त राजकारण दर्शवते, असा हल्लाबोल सिसोदिया यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in