निवडणूक बिनविरोध न झाल्यास भाजपचं गणित दोनच पक्ष सोडवू शकतात!

भाजपला निवडणुकीत विजयासाठी जवळपास 43 हजार मुल्य असलेली मतं कमी पडत आहेत.
PM Narendra Modi Latest News, HM Amit Shah Latest Marathi News
PM Narendra Modi Latest News, HM Amit Shah Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपकडे अजूनही पुरेसं संख्याबळ नाही. त्यामुळे केंद्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला इतर पक्षांकडे हात पसरावे लागणार आहेत. भाजपकडे स्वत:ची आणि एनडीएतील मित्रपक्षांची मतं असूनही आणखी काही मतांची गरज भारणार आहे. त्यासाठी एनडीए आणि युपीएमध्येही नसलेले दोन पक्ष भाजपचा विजय सुकर करू शकतात. (Presidentila Election Latest News)

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा विचार केला तर एकूण मतांचं मूल्य 10 लाख 790 हजार 206 एवढं आहे. या निवडणुकीत विजयासाठी एनडीएला पाच लाख 40 हजार मूल्य असलेल्या मतांची गरज आहे. एकट्या भाजपकडे चार लाख 59 हजार 414 मूल्य असलेली मतं आहेत. त्यासह मित्रपक्ष असलेल्या जेडीयूकडे 22 हजार 485 आणि अण्णाद्रमुककडे असलेल्या मतांचं मुल्य 15 हजार 816 एवढं आहे. (BJD and YSR congress may support BJP in Presidential Election)

PM Narendra Modi Latest News, HM Amit Shah Latest Marathi News
भाजपनं राष्ट्रपतीपदासाठी ‘ते’ नाव पुढं केलं तर पटनाईक नाही म्हणूच शकत नाहीत!

त्यानुसार एनडीएकडील एकूण मतांचं मूल्य 4 लाख 97 हजार 715 एवढं होतं. त्यामुळे निवडणुकीत विजयासाठी एनडीएला केवळ 43 हजार मुल्यांची मतं कमी पडत आहेत. भाजपचं हे गणित ओडिशातील सत्ताधारी बीजेडी आणि आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेस हे दोन पक्ष सोडवू शकतात. दोन्हीही पक्ष कोणत्याही आघाडीत नाहीत. पण भाजपने त्यांच्याशी चर्चा करून उमेदवार निश्चित केल्यास हे दोन्ही पक्ष भाजपच्या पारड्यात मतं टाकू शकतात.

बीजेडीकडे 31 हजार 686 आणि वायएसआर काँग्रेसकडे 43 हजार 450 मुल्यांची मतं आहेत. या दोन्ही पक्षांचा पाठिंबा मिळाल्यास भाजपचा विजय सोपा होईल. विरोधी पक्षांमध्येही सध्या एकी नाही. त्यामुळे एनडीएसाठी हा विजय फारसा कठीण वाटत नाही. भाजपने आदिवासी किंवा अल्पसंख्यांक उमेदवार दिल्यास विरोधकही त्याला विरोध करणार नाहीत, अशी चर्चा आहे. त्यामुळे आता भाजप काय निर्णय घेणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

PM Narendra Modi Latest News, HM Amit Shah Latest Marathi News
मोठी घडामोड : ठाकूरांनी अचानक गाठलं न्यूयॉर्क, आघाडीसह भाजपचं टेन्शन वाढलं

दरम्यान, निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर भाजपसह विरोधकांनी उमेदवार निवडीसाठी चर्चा सुरू केली आहे. भाजपकडून सर्वोनुमते नाव निश्चित करण्यासाठी विरोधी पक्षांशी संपर्क साधला जात आहे. तर विरोधकही आम्ही जे नाव सुचवू त्यावर भाजप विचार करणार का, असा सवाल करत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. या निवडणुकीसाठी भाजपला काही मतांची बेगमी करावी लागणार आहे. पण उमेदवाराचे नाव पुढे येईपर्यंत बहुतेक पक्ष काठावरच उभे राहणार असल्याचे चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com