Bilkis Bano : बिल्कीस बानोंच्या अपराधांच्या शिक्षेबाबत पुनर्विचार नाही : याचिका फेटाळली!

Bilkis Bano : प्रकरणात दोषी ठरलेल्या 11 जणांची 15 ऑगस्ट रोजी गोध्रा उपकारागृहातून सुटका करण्यात आली होती.
Bilkis Bano
Bilkis BanoSarkarnma

Bilkis Bano : 2002 च्या गुजरातमधील गोध्रा दंगलीतील पीडित बिल्किस बानोच्या 11 दोषींच्या मुक्त करण्यात आले होते. याविरोधात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. बिल्किस बानो यांनी गुजरात सरकारच्या 2002 मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील 11 दोषींच्या शिक्षा पुर्ण होण्यापूर्वीच्या सुटकेला आव्हान दिले होते. या प्रकरणातील सर्व 11 दोषींची न्यायालयाने सुटका केली होती.

गुजरात सरकारच्या बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींची शिक्षा माफ करण्याच्या याचिकेवरपुन्हा विचार करण्यास सांगणाऱ्या बिल्किस बानोची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांविरुद्ध पुनर्विलोकन याचिकांवर निर्णय देणारे न्यायाधीश त्यांच्या चेंबरमध्ये निर्णय घेतात. न्यायमूर्ती जय रस्तोगी आणि विक्रम नाथ यांच्या खंडपीठासमोर 13 डिसेंबर रोजी ही याचिका चेंबरमध्ये विचारासाठी आली होती.

Bilkis Bano
Mahavikas aghadi maha morcha : बेळगाव, निपाणी, कारवार महाराष्ट्रात घेणारच ; उद्धव ठाकरेंनी ठणकावले!

सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यक निबंधकांनी बिल्किस बानोच्या वकील शोभा गुप्ता यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली पुनर्विचार याचिका 13 डिसेंबर 2022 रोजी फेटाळण्यात आली आहे.

बिल्किस बानो यांनी दोषीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 13 मे रोजी दिलेल्या आदेशाचा आढावा घेण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला 9 जुलै 1992 च्या धोरणानुसार दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याच्या याचिकेवर दोन महिन्यांत विचार करण्यास सांगितले होते. गुजरात सरकारने 15 ऑगस्ट रोजी 11 दोषींची शिक्षा माफ करून त्यांची सुटका केली.

Mahavikas Aaghadi Morcha Live Update महाराष्ट्र द्रोह्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ : उद्धव ठाकरे

गोध्रा ट्रेन जाळल्यानंतर उसळलेल्या दंगलीत बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार झाला आणि तिच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करण्यात आली. घटनेच्या वेळी बिल्किस बानो 21 वर्षांची आणि पाच महिन्यांची गर्भवती होती.या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आणि सर्वोच्च न्यायालयाने खटला महाराष्ट्रातील न्यायालयाकडे वर्ग केला.

21 जानेवारी 2008 रोजी मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पुढे मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्यांची शिक्षा कायम ठेवली.या प्रकरणात दोषी ठरलेल्या 11 जणांची 15 ऑगस्ट रोजी गोध्रा उपकारागृहातून सुटका करण्यात आली होती. गुजरात सरकारने राज्याच्या शिक्षा माफी धोरणांतर्गत या दोषींना सोडण्याची परवानगी दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in