Bilkis Bano Case: 11 दोषींच्या सुटकेस आव्हान ; सरन्यायाधीश चंद्रचूडांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ करणार सुनावणी !

Supreme Court : 11 दोषींची 15 ऑगस्ट रोजी सुटका करण्यात आली होती.
Bilkis Bano case :
Bilkis Bano case :Sarkarnama

Gujarat News : गुजरात अत्याचारकांड प्रकरणातील बिल्किस बानो या प्रकरणात मोठी घडामोड समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने बिल्किल बानो या प्रकरणात ११ दोषींच्या सुटकेच्या मुद्द्यावर पुन्हा सुनावणी घेण्यास परवानगी दर्शवली होईल. तसेच, विशेष खंडपीठासमोर ही सुनावणी घेण्यासही सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने होकार दर्शवला आहे. (Bilkis Bano case SC agrees to constitute special bench to hear pleas challenging order of Gujarat govt)

Bilkis Bano case :
Dr.Bhagwat Karad News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर स्वास्थ केंद्राचे उद्घाटन

बिल्किस बानो अत्याचार प्रकरणातील दोषींची गुजरात सरकारकडून शिक्षा पूर्ण होण्याआधीच, त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 11 दोषींच्या सुटकेनंतर, तुरूंगाबाहेर या दोषींचा सत्कार, सन्मान करण्यात आला. त्यांना हारतुर् घालण्यात आले. यानंतर मोठे वादंगही निर्माण झाले होते. गुन्हा आणि गुन्हेगारांचं उदात्तीकरण गुजरात सरकार करत आहे , अशी समाज माध्यमातून सरकारवर टीका होत होती.

दरम्यान, आता या सुटका करण्यात आलेल्या गुजरात सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे. या दोषींच्या सुटकेवर आक्षेप घेऊन, याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची आता सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे.

Bilkis Bano case :
Parinay Fuke News : डॉ. फुकेंनी १५ दिवसांत सोडवला कुणबी समाजाच्या जमिनीचा प्रश्‍न !

2002 यावर्षी झालेल्या गुजरात दंगलमध्ये बिल्किस बानो या महिलेवर अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणी 11 दोषींची 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी मुक्तता करण्यात आली होती. गुजरातमधील गोध्रा येथील कारागृहामध्ये 11 दोषी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते.

आपली जन्मठेपेची शिक्षा माफ करण्यात यावी, असा याचनेचा अर्ज दोषींकडून करण्यात आला होता. गुन्हेगाराचे वय, गुन्ह्याचे स्वरुप, शिक्षा भोगत असताना त्यांची वर्तवणूक या सर्व बाबी लक्षात घेऊन, त्यांची सुटका करण्यात येत आहे, असा निर्णय गुजरात सरकारने म्हंटलेो होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com