भाजप आमदाराचे हसे : उद्घाटनाच्या नारळाने रस्त्यात पडला खड्डा

"रस्त्याच्या उद्घाटनाला नारळ फोटण्याऐवजी त्या धक्क्यानेच खड्डा पडला"
suchi choudhari
suchi choudhari Sarkarnama

बिजनोर : उत्तरप्रदेश मधील बिजनोरमधून एक धक्कादायक पण तेवढीच विचार करायला लावणारी बातमी समोर येत आहे. काल याठिकाणी नव्या कोऱ्या रस्त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात नारळ फोडताना नारळाच्या जागी त्या धक्क्यानेच रस्त्यात खड्डा पडला. यामुळे रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याला आलेल्या भाजपच्या आमदाराचे चांगलेच हसे झाले. त्यावर नाराज झालेल्या आमदार रस्त्याची गुणवत्ता आणि दर्जा या गोष्टींविरोधत धरणे आंदोलनाला बसल्या आणि त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी भाजप आमदार सुची चौधरी बिजनोरमधील खेडा गावाजवळच्या ७ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे लोकार्पण करण्यासाठी पोहोचल्या. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांच्या हातात उद्घाटनासाठी नारळ दिला. आमदारांनी अगदी ताकदीने नारळ फोडण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी नारळ फुटण्याऐवजी त्या धक्क्याने नारळ फोडलेल्या ठिकाणी खड्डा पडला. तब्बल १ कोटी १६ लाख रुपये खर्चून बांधलेला रस्ता उखडला.

suchi choudhari
अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द

या प्रकारानंतर आमदारांचे पती मौसम चौधरी यांनी फावड मागवून रस्त्याचा दर्जा तपासला, तर रस्ता उखडण्यास सुरुवात झाली. नव्या रस्त्याच्या या अवस्थेमुळे नाराज झालेल्या आमदारांनी पुढचा सगळा कार्यक्रम स्थगित करुन रस्त्याची गुणवत्ता आणि दर्जा या गोष्टींविरोधत धरणे आंदोलनाला बसल्या आणि त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात या गोष्टीची माहिती मिळाल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तडक घटनास्थळी पोहचले. यावेळी उपस्थित अभियंता विकास अग्रवाल यांनी सांगितले की, रस्त्याचा नमुना घेतला असून काही चुकीचे आढळल्यास गंभीर कारवाई करण्यात येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com