बिहारच्या राजकारणात PK फॅक्टर किती महत्वाचा ? तेजस्वी यादवाचं मोठं विधान

प्रशांत किशोर यांच्या विधानामुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापलं आहे.
Prashant Kishor, tejaswhi yadav
Prashant Kishor, tejaswhi yadavsarkarnama

नवी दिल्ली : "नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या राजवटीच्या 30 वर्षानंतरही बिहार हे देशातील सर्वात मागासलेले आणि गरीब राज्य आहे," असा आरोप निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (PK) यांनी नुकताच केला. त्यांच्या या विधानामुळे बिहारमधील राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधीपक्षनेते तेजस्वी यादव (tejaswhi yadav) यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. (Prashant Kishor Latest News)

प्रशांत किशोर (Prashant Kishor) हे बिहारमध्ये नवा पक्ष स्थापन करण्याची शक्यता आहे. यावर तेजस्वी यादव यांनी टि्वट करीत प्रशांत किशोर यांच्यावर टीका केली आहे. "प्रशांत किशोर यांना बिहारमध्ये कुणीही मान देत नाही. त्यांच्याशी संबधीत कुठलीही बातमी आम्ही पाहत नाही," असे तेजस्वी यादव यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. पीकेंच्या बिहार एन्ट्रीमुळे बिहारच्या राजकारणावर काहीही परिणाम होणार नाही, असे यादव यांनी सांगितलं.

Prashant Kishor, tejaswhi yadav
कर्नाटक काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काही तासातच माजी कॅबिनेटमंत्री भाजपमध्ये

बिहारच्या राजकारणात प्रशांत किशोरची एन्ट्री नक्की असल्याचे चर्चा सध्या सुरु आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishore) बिहारमध्ये (Bihar) 'जन-सुराज' (गुड गव्हर्नन्स) आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. येत्या दोन ऑक्टोबरपासून बिहारमधील पश्चिम चंपारण येथून 3 हजार किलोमीटरची पदयात्रा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

Prashant Kishor, tejaswhi yadav
महाविकास आघाडीची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार ? उद्धव ठाकरे की शरद पवार..

"परिवर्तनाचा विचार असलेले १७ हजारहून अधिक जण संपर्कात आहेत. विकासाच्या अनेक मापदंडांमध्ये बिहार अजूनही देशातील सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. बिहारला आगामी काळात आघाडीच्या राज्यांच्या यादीत यायचे असेल, तर त्यासाठी नवा विचार आणि नव्या प्रयत्नांची गरज आहे," असे प्रशांत किशोर म्हणाले.

प्रशांत किशोर म्हणाले,"सध्या मी कोणताही राजकीय पक्ष काढणार नसून 17 हजार लोकांशी बोलणार असल्याचे ते म्हणाले. या परिस्थितीत सर्व लोक पक्ष स्थापन करण्यास तयार असतील तर पक्ष स्थापन करण्याचा विचार केला जाईल, परंतु तो पक्ष केवळ माझा नसून त्यात योगदान देणाऱ्या सर्व लोकांचा असेल,"

प्रशांत किशोर यांचा बिहारमधील आगामी कार्यक्रम

  • दोन आँक्टोबरपासून पश्चिम चंपारण येथून पदयात्रेस सुरवात

  • तीन हजार किलोमीटर पदयात्रा वर्षभरात पूर्ण होणार

  • अराजकीय व्यक्तींशी संवाद साधणार

  • पक्ष स्थापन करण्याची गरज असल्यास तसा विचार करणार

  • बिहारच्या जनतेच्या अपेक्षा जाणून घेणार

  • 'जन-सुराज' (गुड गव्हर्नन्स)संकल्पना जनतेपर्यंत पोहचविणार

  • पूर्ण ताकदीने बिहारच्या जनतेसोबत काम करण्यास सक्षम

  • जनतेशी संवाद साधण्यावर पूर्ण फोकस

  • बिहारमध्ये परिवर्तन करण्याची जिद्ध असलेल्यांना एकत्र जोडणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com