RJD : राजदच्या बैठकीत राडा ; लालू प्रसाद यादव घेणार अंतिम निर्णय

RJD : शहराध्यक्षपदासाठी दोन दावेदार असल्याने त्यावर एकमत होऊ शकले नाही.
 Lalu Prasad Yadav
Lalu Prasad Yadavsarkarnama

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) बैठकीत वाद झाल्याने अनेक पदाधिकारी नाराज झाले आहेत, काल (शनिवारी) झालेल्या बैठकीतून राजदचे राष्ट्रीय महासचिव श्याम रजक संतापात बाहेर निघून गेले.

यापुढील निर्णय आता राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव (lalu prasad yadav) हेच निर्णय घेतील, असे श्याम रजक यांनी माध्यमांना सांगितले. पाटना जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदासाठी राजदने या बैठकीचे आयोजन केले होते. पण नियुक्तीवरुन वाद झाल्याने श्याम रजक बैठकीतून बाहेर पडले. जिल्हाध्यक्षपदाच्या नावाला सर्वांनी अनुमती दिली होती. तर शहराध्यक्षपदाच्या नावावरुन बैठकीत वाद झाला.

शहराध्यक्षपदासाठी दोन दावेदार असल्याने त्यावर एकमत होऊ शकले नाही. या पदासाठी महताब आलम आणि प्रदीप मेहता यांनी अर्ज दिला होता. पण प्रदीप मेहता यांचा अर्ज अपूर्ण असल्याचा आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरला.

त्यामुळे महताब आलम यांची बिनविरोध निवड करण्याचे निश्चित झाले. या दरम्यान राजदचे नेता आजाद गांधी यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला विरोध केला. हा निर्णय योग्य असल्याचे श्याम रजक यांचे म्हणणे होते. यावरुन वाद झाला.

 Lalu Prasad Yadav
Dasara Melava : मैदान शिंदे गटाला मिळणार ; ठाकरे गटाचा अर्ज फेटाळला

बैठकीतून श्याम रजक बाहेर पडल्याने त्यांना परत बोलावण्यासाठी आलम यांना धावाधाव करावी लागली, त्यामुळे शहराध्यक्षपदाची निवडीचा निर्णय आता लालू प्रसाद यादव घेणार असल्याचे समजते. पाटना जिल्हाध्यक्षपदी देवमुनी सिंह यादव यांनी निवड करण्यात आली आहे. गेली २५ वर्ष देवमुनी सिंह यादव जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

दरम्यान आयआरसीटीसी (IRCTC) घोटाळ्याप्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejasvi Yadav) यांचा जामीन रद्द करण्यासाठी सीबीआयने शनिवारी न्यायालयात धाव घेतली आहे.

यादव यांचा जामीन रद्द करण्यासाठी सीबीआयकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. राऊज एव्हेन्यू येथील विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांच्या न्यायालयाने सीबीआयच्या याचिकेवर तेजस्वी यादव यांना नोटीस बजावली आहे. यामुळे आता जामीन रद्द होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com