भाजपला टक्कर देणं पडलं महागात; मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्र्यालाच थेट घरी बसवलं

बिहारमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीआधीच भाजपने (BJP) मित्रपक्षाला धक्का देत तीन आमदार फोडले आहेत.
Nitish Kumar, Mukesh Sahani
Nitish Kumar, Mukesh SahaniSarkarnama

पाटणा : बिहारमध्ये (Bihar) विधानसभेच्या पोटनिवडणुकीआधीच भाजपने (BJP) मागील आठवड्यात मित्रपक्षाला धक्का देत तीन आमदार फोडले. त्यानंतर आता या पक्षाचे प्रमुख व कॅबिनेट मंत्र्यालाही मंत्रिपदावर पाणी सोडावे लागले आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनीच त्यांचा काटा काढत मंत्रिपद काढून घेतलं आहे. तीनही आमदार गेल्यानं ते मंत्रिपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा होती. पण त्यांनी राजीनामा न दिल्याने मुख्यमंत्र्यांनीच मंत्रिपद काढून घेतल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

विकासशील इन्सान पक्षाचे (VIP) प्रमुख मुकेश सहानी (Mukesh Sahani) यांना मंत्रिपद गमवावं लागलं आहे. मागील आठवड्यात बुधवारी आमदार मिस्त्री लाल यादव, राजु सिंग आणि स्वर्ण सिंग या तिघांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. चौथ्या आमदाराचा मृत्यू झाला असून त्याच जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. तर सहानी यांची विधान परिषदेची मुदतही काही दिवसांत संपत आहे.

Nitish Kumar, Mukesh Sahani
आदित्य ठाकरेंच्या दोन्ही हातातील घड्याळाचं गुपित काय? भाजपचं ट्विट अन् बरंच काही...

सहानी यांचे मंत्रिपद जाणार, हे जवळपास निश्चित मानले जात होते. कारण उत्तर प्रदेश निवडणुकीपासून ते भाजपच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यातच बिहारमधील पोटनिवडणुकीने दोन्ही पक्षांतील दुरावा अधिकच वाढला. त्यानंतर भाजपने थेट मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर नितीश कुमार यांनी त्यांचे मंत्रिपद काढून घेत तसा प्रस्ताव रविवारी राज्यपालांकडे पाठवला होता. राज्यपालांनी त्यावर स्वाक्षरी केल्यानं सहानी यांचं मंत्रिपद गेलं आहे.

भाजप आणि सहानी यांच्यामध्ये वाद वाढण्याचे कारण विधानसभेची पोटनिवडणूक ठरली आहे. बिहारमधील बोचाहा मतदारसंघाची निवडणूक 12 एप्रिल रोजी होणार आहे. सहानी यांच्या पक्षाचे आमदार मुसाफिर पासवान यांच्या निधनामुळे हा जागा रिक्त आहे. या जागेवर भाजपने उमेदवार उभा केल्यानंतर सहानी यांनी नाराजी व्यक्त केली. नितीश कुमार यांच्या माध्यमातून सहानी यांनी भाजपने ही जागा सोडण्याची विनंती केल्याचे समजते. पण भाजप तयार न झाल्याने सहानी यांचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे.

सहानी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतही 49 उमेदवार उतरवले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर ते प्रचारसभेत जोरदार टीका करत होते. तेव्हापासूनच बिहारमधील भाजप नेते नाराज होते. आता बिहार पोटनिवडणुकीने त्यात भरच पडली. त्यामुळे भाजपने तीनही आमदार फोडत सहानी यांना झटका दिला. बिहार विधानसभा निवडणुकीआधी सहानी यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com